Join us  

झुनझुनवाला यांनी या फार्मा कंपनीवर दाखवला विश्वास, खरेदी केले 62 लाख शेअर; तुमच्याकडे आहे का हा स्टॉक?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 6:00 PM

कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार, रेखा झुनझुनवाला यांनी 1.9 टक्के हिस्सा घेण्यासाठी 122.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

शेअर बाजारात असे अनेक गुंतवणूकदार आहेत, जे काही मोठ्या गुंतवणूकदारांच्या गुंतवणुकीवर लक्ष ठेऊन गुंतवणूक करतात. असेच, रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांच्या पोर्टफोलिओवर लक्ष ठेवणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. दिग्ग्ज गुंतवणूकदार रेखा झुनझुनवाला यांनी मिड-कॅप कंपनी सन फार्मा अॅडव्हान्स रिसर्चला त्याच्या पोर्टफोलिओमध्ये सामील केले आहे. या कंपनीचे मार्केट कॅप 6305 कोटी रुपये एवढे आहे.

रेखा झुनझुनवाला यांनी किती शेअर खरेदी केले? -कंपनीच्या शेअर होल्डिंगनुसार, रेखा झुनझुनवाला यांनी 1.9 टक्के हिस्सा घेण्यासाठी 122.30 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. रेखा यांनी सन फार्मा एडव्हॉन्स्ड रिसर्च कंपनीचे 62,92,134 शेअर खरेदी केले आहेत. याशिवाय रेखा झुनझुनवाला यांनी गेल्या आर्थिक वर्षाच्या मार्च तिमाहीत Raghav Productivity Enhancers Ltd मध्येही पहिल्यांदा गुंतवणूक केली होती. रेखा झुनझुनवाला यांच्या पोर्टफोलियोमोध्ये तब्बल 29 कंपन्यांचा समावेश आहे. ज्यांची नेट व्हॅल्यू 28,437.60 कोटी रुपये एवढी आहे.

डिसेंबर तिमाहीत कंपनीचे नेट उत्पादन 131.12 रोटी रुपये होते. डिसेंबर 2021 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न 62.49 कोटी रुपेय होते. गेल्या आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचे नेट प्रॉफिट 10.15 कोटी रुपये होते. तसेच डिसेंबर 2021 मध्ये कंपनीला 15.84 कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. यानुसार, सनफार्माच्या व्यवसायात सुधारणा दिसत आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारराकेश झुनझुनवालाशेअर बाजारगुंतवणूक