Lokmat Money >शेअर बाजार > ₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 02:30 PM2023-08-24T14:30:58+5:302023-08-24T14:32:10+5:30

जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला.

jindal steel and power ltd's rs2 share gave 24229 percent return Experts say the price can go up to rs740 | ₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 24229% परतावा; एक्सपर्ट म्हणतायत ₹740 वर जाऊशकतो भाव!

शेअर बाजारात जिंदल स्टिल अँड पॉवर लिमिटेडच्या (JSPL) शेअरमध्ये जबरदस्त तेजी दिसत आहे. हा शेअर आपल्या 52- आठवड्यांतील निचांकाच्या तुलनेत तब्बल 75 टक्क्यांनी वधारला आहे. जिंदल स्टिलचा स्टॉक 23 ऑगस्ट, 2022 रोजी 52-आठवड्यांतील निचांक 377.05 रुपयांवर आला आहे. कंपनीचा स्टॉक 11 ऑगस्ट, 2023 रोजी 700 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता आज गुरुवारी हा स्टॉक 666 रुपयांवर खुला झाला.

तांत्रिक दृष्या, जिंदल स्टिलचा रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (आरएसआय) 55.1 वर आहे. जे स्टॉक ना ओव्हरसोल्ड आहे, ना ओव्हरबॉट आहे, असे दर्शाते. या शेअरचा एका वर्षातील बीटा 1.4 आहे. हे या काळातील अधिक अस्थिरता दर्शवते. जिंदल स्टिलचा शेअर 5 दिवस, 20 दिवस, 50 दिवस, 100 दिवस आणि 200 दिवसांपेक्षा अधिक, मात्र 10 दिवसांच्या मुव्हिंग सरासरीच्या तुलनेत कमी लेव्हलवर व्यवहार करत आहे.

शेअरनं दिला बम्पर परतावा -
गेल्या तीन वर्षांत जेएसपीएलच्या शेअरने 196 टक्क्यांची उसळी घेतली आहे. 2023 मध्ये या शेअरमध्ये केवळ 12 टक्क्यांची वाढ झाली. मात्र, गेल्या एका वर्षात या शेअरने 67.48 टक्यांची उसळी घेतली आहे. तसेच गेल्या पाच वर्षांचा विचार करता हा शेअर 229.13 टक्क्यांनी वधारला आहे. या शेअरचा जास्तीत जारस्त परतावा 24,229.67 टक्के एवढा होता. या काळात हा शेअर दोन रुपयांवरून सद्यस्थितित आला आहे.

काय म्हणतायत एक्सपर्ट्स -
टिप्स 2 ट्रेड्सचे अभिजीत यांनी म्हटल्याप्रमाणे, "जिंदल स्टील 662.3 रुपयांवर पुढील रेजिस्टन्ससह दैनिक चार्टवर काही प्रमाणावर मंदीच्या स्थितीत दिसत आहे. या रेजिस्टन्सवर दैनिक बंद झाल्यानंतर, नजीकच्या काळात 720 रुपयांचे लक्ष्य मिळू शकते. समर्थन 633 रुपयांवर असेल." प्रोग्रेसिव्ह शेअर्सचे संचालक आदित्य गग्गर यांनी या शेअरचे लक्ष 825 रुपये एवढे  निश्चित केली आहे. कोटक इंस्टीट्यूशनल इक्विटीजने या शेअरची टार्गेट प्राइस 580 रुपायंवरून 740 रुपये केली आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

 

Web Title: jindal steel and power ltd's rs2 share gave 24229 percent return Experts say the price can go up to rs740

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.