Join us  

अचानक रॉकेट बनला मुकेश अंबानी यांचा 'हा' स्टॉक, आज 9% वाढ; कारण...

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2024 7:12 PM

Jio Financial Services Share : शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅपदेखील 2.19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

Jio Financial Services Share : आठवड्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजारात जोरदार तेजी पाहायला मिळाली. बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचा सेन्सेक्स आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या निफ्टीने सर्व विक्रम मोडीत काढत नवीन उच्चांक गाठला. दरम्यान, शेवटच्या अर्ध्या तासात मुकेश अंबानी यांच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे शेअर्स 9 टक्क्यांपर्यंत वधारले. 

शेवटच्या अर्ध्या तासात बाजाराने वेग पकडलासोमवारी शेअर बाजाराच्या व्यवहारादरम्यान जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस शेअरची सुरुवात किंचित वाढ झाली. हा शेअर 323 रुपयांच्या पातळीवर उघडला आणि दुपारी 2.50 पर्यंत किंचित वाढीसह व्यवहार करत होता. पण, शेअर बाजारातील व्यवहाराच्या शेवटच्या अर्ध्या तासात या शेअरने रॉकेट वेग पकडला आणि 9 टक्क्यांनी वाढून रु. 349.35 वर पोहोचला. बाजार बंद झाल्यानंतर हा 8.18 टक्क्यांच्या वाढीसह 348 रुपयांवर बंद झाला. शेअर्सच्या वाढीमुळे कंपनीचे मार्केट कॅप (JioFin MCap) देखील 2.19 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढले आहे.

तज्ज्ञ जिओफिनवर उत्साही आपण आठवड्याच्या पहिल्या दिवसाच्या मार्केट डेटावर नजर टाकली तर, Jio Financial Services मध्ये एकूण 66.09 लाख इक्विटी व्यवहार झाले आणि एकूण उलाढाल सुमारे 222 कोटी रुपये होती. हा आकडा गेल्या दोन आठवड्यांमधील 19.40 लाख शेअर्सच्या सरासरी उलाढालीपेक्षा जास्त होता. मार्केट तज्ञ या शेअरबद्दल उत्साही असून, यात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

रिलायन्स एजीएम नंतर अचानक वाढमुकेश अंबानींच्या या नव्या कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांना मिळालेल्या परताव्यावर नजर टाकली, तर गेल्या वर्षभरात त्याची किंमत सुमारे 40 टक्क्यांनी वाढली आहे. कंपनीचे शेअर्स बीएसईवरमध्ये 265 रुपयांना सूचीबद्ध झाले होते, तर एनएसईवर 262 रुपयांवर सूचीबद्ध झाले होते. गेल्या आठवड्यात रिलायन्सच्या एजीएममध्ये अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे कौतुक करताना सांगितले होते की, जिओफिनचा व्यवसाय वेगाने प्रगती करत आहे आणि त्याचे बाजार भांडवल 2 लाख कोटी रुपयांच्या पुढे गेले आहे. एजीएममध्ये केलेल्या कौतुकाचा परिणाम सोमवारी शेअरवर स्पष्टपणे दिसून आला.

गृहकर्ज क्षेत्रात प्रवेशाची घोषणा Jio Financial Services ही रिलायन्स इंडस्ट्रीजची नॉन-बँकिंग फायनान्स कंपनी (NBFC) आहे. जिओ फायनान्स शेअरमध्ये या तुफानी वाढीमागील इतर कारणांबद्दल बोलल्यास, कंपनीने केलेली घोषणा देखील असू शकते. जिओफिन लवकरच होम लोन क्षेत्रात प्रवेश करणार आहे. रिलायन्स एजीएम दरम्यान भागधारकांना संबोधित करताना जिओ फायनान्शियल सर्व्हिसेसचे एमडी आणि सीईओ हितेश सेठिया यांनी ही माहिती दिली आहे.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :मुकेश अंबानीशेअर बाजारशेअर बाजार