Join us

Jio Finance Share Price : तिमाही निकालांपूर्वी जिओ फायनान्शिअलच्या शेअरमध्ये घसरण, पाहा काय आहे स्थिती?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 1:24 PM

Jio Financial Services Share: यापूर्वी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं जगातील टॉप ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅक रॉकसोबत करार केला होता.

Jio Financial Services Share: मुकेश अंबानींच्या मालकीच्या जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीचे शेअर्स शुक्रवारच्या ट्रेडिंग सत्रात तीन टक्क्यांनी घसरून 372 रुपयांच्या पातळीवर आले. परंतु यात काही वेळात रिकव्हरी दिसून आली. आज जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस चौथ्या तिमाहीचे निकाल सादर करण्याची शक्यता आहे. 

या आठवड्यात, जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) जगातील टॉप ॲसेट मॅनेजमेंट कंपनी ब्लॅक रॉकसोबत (BlackRock) करार केला होता. या करारानुसार, दोन्ही कंपन्या भारतीय बाजारपेठेत असेट्स मॅनेजमेंट आणि ब्रोकिंग व्यवसायात काम करतील. यानंतर शेअरमध्ये जबरदस्त वाढ दिसून आली होती.

 

जिओ फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनीबद्दल सांगायचं झालं तर, ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्री लिमिटेडमधून डी मर्ज झाल्यानंतर शेअर बाजारात ऑपरेट करत आहे. कंपनीचा स्टॉक 265 रुपयांच्या पातळीवर लिस्ट झाला होता. त्यावेळी कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज सुमारे 211 रुपये होते. कंपनीचा शेअर जवळपास 25 टक्के प्रीमिअमसह लिस्ट झाले होते. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या अखेरच्या तिमाहीबद्दल म्हणजे डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीच्या महसुलात सुमारे 32 टक्के घट नोंदवली गेली होती. 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली होती. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :रिलायन्समुकेश अंबानीजिओ