Join us

Jio Financial Servicesची शेअर बाजारात एन्ट्री, बीएसईवर ₹२६५ वर लिस्टिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 11:24 AM

रिलायन्समधून डिमर्ज झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं सोमवारी बाजारात एन्ट्री केली.

रिलायन्समधून डिमर्ज झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसनं (Jio Financial Services) सोमवारी बाजारात एन्ट्री केली. बीएसईवर कंपनीच्या शेअर्सची 265 रुपयांवर सुरुवात झाली. पूर्वी ही कंपनी रिलायन्सचा एक भाग होती आणि आता ती रिलायन्समधून वेगळी होऊन शेअर बाजारात लिस्ट झाली आहे. रिलायन्सच्या भागधारकांना प्रत्येक शेअरमागे या कंपनीचा एक शेअर मिळाला. दरम्यान, आणखी एक गोष्ट अशी आहे की हा शेअर आज जरी लिस्ट झाला असला तरी पुढील 10 दिवसांसाठी त्यात इंट्रा-डे ट्रेडिंग करू शकणार नाहीत, म्हणजेच ते ट्रेड-टू-मध्येच राहतील. 

दुसरीकडे, रिलायन्सचे शेअर्स 1.33 टक्क्यांनी घसरून 2522.65 रुपयांवर (Reliance Share Price) आहे. त्याच वेळी, जिओ फायनान्शियलच्या शेअर्समध्ये देखील घसरण झाली आहे आणि ते बीएसईवर 251.75 रुपयांवर (Jio Financial Services Share Price) आले.

ट्रेड टू ट्रेडचा अर्थ काय?ट्रेड टू ट्रेड सेगमेंटमध्ये जर कोणता शेअर ट्रेड होत असेल तर याचा अर्थ असा की शेअरमध्ये केवळ डिलिव्हरी बेसिसवरच व्यवहार होईल. जर तुम्ही सकाळी खरेदी करून ते संध्याकाळी विकण्याच्या इच्छेत असाल तर ते करू शकणार नाही. एकाच दिवसातील खरेदी विक्रीला इंट्रा-डे ट्रेडिंग म्हटलं जातं आणि जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसला हे 10 दिवसांसाठी करता येणार नाही. जर तुम्ही शेअर विकून कामकाजाच्या 10 दिवसांमध्ये ते विकण्याचा प्रयत्न कराल, तर तुमची ऑर्डर रिजेक्ट होईल. तुम्ही 10 दिवस केवळ डिलिव्हरी आधारित ट्रेडिंगच करू शकता.

किती आहे मार्केट कॅपजिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचं मार्केट कॅप सध्या 1,59,943.93 कोटी रुपये आहे. हे टाटा स्टील, इंडियन ऑईल, हिंदुस्तान झिंक, एसबीआय लाईफ इन्शूरन्स आणि टेक महिंद्रासारख्या दिग्गज कंपन्यांच्या मार्केट कॅपपेक्षा अधिक आहे. रिलायन्सचं मार्केट कॅप 17,29,765.52 कोटी रुपये आहे आणि या मार्केट कॅपच्या बाबतीत ही देशातील सर्वात मोठी कंपनी आहे.

(टीप - यामध्ये केवळ शेअरची सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजाररिलायन्समुकेश अंबानी