सोमवारच्या तेजीनंतर मंगळवारी शेअर बाजारावर दबाव दिसून आला. असं असलं तरी जेपी पॉवरच्या शेअर्सना आज अपर सर्किट लागलं. सुरुवातीच्या कामकाजादरम्यान शेअर 5% वाढून 16.80 रुपयांवर आला. हा तोच स्टॉक आहे ज्याची किंमत एकेकाळी 137 रुपये होती. एक अशीही वेळ आली होती की जेपी पॉवरच्या शेअरची किंमती फक्त 50 पैसे झाली होती. जर आपण या दराची तुलना केली तर तो जवळजवळ 33 पट वाढला आहे.
जेपी पॉवर म्हणजेच जय प्रकाश पॉवर व्हेंचर्सचे शेअर्स आज 16.60 रुपयांवर उघडले आणि 16.45 रुपयांपर्यंत घसरल्यानंतर पुन्हा 16.80 रुपयांवर पोहोचले. गेल्या दोन दिवसांपासून त्यात सातत्याने अप्पर सर्किट लागत आहे. गेल्या सहा महिन्यांत त्यात 67 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर या वर्षी आतापर्यंत शेअरनं 14 टक्के परतावा दिला आहे. मात्र, गेल्या एका वर्षात तो 5.75 रुपयांवरून हा टप्पा गाठण्यात यशस्वी झाला आहे. या कालावधीत शेअरची किंमत 192 टक्क्यांहून अधिक वाढली आहे. याचा अर्थ गुंतवणूकदारांच्या पैशात जवळपास तिप्पट वाढ झालीये.
पाच वर्षांत 663 टक्क्यांची वाढ
गेल्या 5 वर्षांत, जेपी पॉवरनं 663 टक्के मल्टीबॅगर परतावा दिला आहे. 5 एप्रिल 2019 रोजी या शेअरची किंमत प्रति शेअर फक्त 2.20 रुपये होती. 22 एप्रिल 2005 रोजी या शेअरची किंमत 30.75 रुपये होती. तर 4 जून 2008 रोजी कंपनीचा शेअर 137.10 रुपयांवर पोहोचला. यानंतर या शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि 27 मार्च 2020 रोजी हा शेअर 50 पैशांर आला होता.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)