Lokmat Money >शेअर बाजार > ₹16 चा शेअर बनला रॉकेट, दिला 2180 टक्क्यांचा परतावा; जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट

₹16 चा शेअर बनला रॉकेट, दिला 2180 टक्क्यांचा परतावा; जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट

JTL Industries चा शेअर आज बुधवारी इंड्रा डे ट्रेड मध्ये 5.35 टक्क्यांनी वधारून 359.50 रुपयांवर पोहोचला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 05:13 PM2023-06-28T17:13:24+5:302023-06-28T17:13:54+5:30

JTL Industries चा शेअर आज बुधवारी इंड्रा डे ट्रेड मध्ये 5.35 टक्क्यांनी वधारून 359.50 रुपयांवर पोहोचला आहे.

jtl industries share became rocket, gave 2180 percent return | ₹16 चा शेअर बनला रॉकेट, दिला 2180 टक्क्यांचा परतावा; जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट

₹16 चा शेअर बनला रॉकेट, दिला 2180 टक्क्यांचा परतावा; जाणून घ्या काय म्हणतायत एक्सपर्ट

आयरन आणि स्टिल पाईप तयार करणारी कंपनी जेटीएल इंडस्ट्रीजने (JTL Industries share) गेल्या तीन वर्षांत आपल्या गुतंवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा दिला आहे. ब्रोकरेज फर्म या शेअर्सवर बुलिश आहेत आणि हा शेअर खरेदी करण्याचा सल्ला देत आहेत. JTL Industries चा शेअर आज बुधवारी इंड्रा डे ट्रेड मध्ये 5.35 टक्क्यांनी वधारून 359.50 रुपयांवर पोहोचला आहे.

काय म्हणतायत एक्सपर्ट? - 
ब्रोकरेज फर्म अॅक्सिस सिक्युरिटीजने स्ट्रॅटेजिकली स्थापन केलेले प्लांट्स, अॅग्रेसिव्ह कॅपेसिटी एक्सपांशन आणि व्हॅल्यू ग्रोथ प्लॅनच्या माध्यमाने व्यापक डिस्ट्रिब्यूशनचा हवाला देत जेटीएल इंडस्ट्रीजवर 'बाय' रेटिंगसह कव्हरेज सुरू केले आहे आहे. महत्वाचे म्हणजे, जेटीएलचे भारतभरात भौगोलिकदृष्ट्या चार उत्पादन सुविधा पसरल्या आहेत. यामुळे, कंपनीला स्पर्धात्मक किमतीत कच्च्या मालाच्या पुरवठ्या होऊ शकतो. याच बरोबर कंपनी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारात आपल्या बिक्रीचा विस्तारही करू शकते.

कंपनीच्या शेअरची स्थिती - 
जेटीएल इंडस्ट्रीजचा शेअर बुधवारी 5 टक्क्यांहून अधिक वाढून 364.95 रुपयांवर पोहोचला असून कंपनीचे एकूण मार्केट कॅप जवळपास 3,100 कोटी रुपये झाले आहे. जेटीएल इंडस्ट्रीजचा शेअर सप्टेंबर 2022 मध्ये आपल्या 52-आठवड्याच्या 185.70 रुपयांच्या निचांकावरून जवळपास 98 टक्कांनी वाढला आहे. या शेअरमध्ये 2022 मध्ये आतापर्यंत 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. या शेअरने गेल्या 3 वर्षांत आपल्या कोरोना काळातील 16 रुपयांच्या निचांकी पातळीचा विचार करता 2,180 टक्क्यांचा परतावा दिला आहे.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: jtl industries share became rocket, gave 2180 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.