Lokmat Money >शेअर बाजार > Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2023 11:33 AM2023-07-19T11:33:19+5:302023-07-19T11:33:43+5:30

कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती. आता गुंतवणूकदारांचा निर्णय योग्य ठरल्याचं दिसत आहे.

Kaka IPO Listing makes a stunning entry doubles investors money in IPO on the first day sme sector know details | Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Kaka IPO Listing: 'काका'ची जबरदस्त एन्ट्री, पहिल्याच दिवशी IPO मधील गुंतवणूकदारांचे पैसे डबल

Kaka IPO Listing: काकाच्या शेअर्सनी बाजारात एन्ट्री घेताच जबरदस्त कामगिरी केली आहे. कंपनीच्या IPO मध्ये गुंतवणूकदारांनी यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली होती आणि आता कंपनीच्या शेअर्सच्या धडाकेबाज एन्ट्रीनं त्यांचा निर्णय योग्य ठरला आहे. या आयपीओमध्ये शेअरची किंमत 58 रुपये निश्चित करण्यात आली होती.

आज बीएसईच्या एसएमई (SME) प्लॅटफॉर्मवर कंपनीचे शेअर्स 110.20 रुपयांवर लिस्ट झाले. म्हणजेच यात 90 टक्क्यांचा लिस्टिंग गेन मिळाला. यानंतरही शेअर्सची रॅली थांबली नाही आणि या पातळीपासून आणखी 5 टक्क्यांनी उसळी घेत या शेअरला 115.71 रुपयांचं अपर सर्किट लागलं. म्हणजेच पहिल्याच दिवशी आयपीओमधील गुंतवणूकदारांचे पैसे जवळपास दुप्पट झाले.

जबरदस्त प्रतिसाद
काका इंडस्ट्रीजचा 21.23 कोटी रुपयांचा आयपीओ 10 ते 12 जुलैपर्यंत सबस्क्रिप्शनसाठी खुला होता. गुंतवणूकदारांनी या आयपीओला जबरदस्त प्रतिसाद दिला. तसंच हा आयपीओ एकूण 292.66 पट सबस्क्राईब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा (QIB) हिस्सा 72.13 पट, नॉन इन्स्टिट्युशनल इन्व्हेस्टर्सचा (NII) हिस्सा 431.85 पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांचा हिस्सा 358.88 पट होता. या इश्यू अंतर्गत, 10 रुपयांची फेस व्हॅल्यू असलेले 36.60 लाख इक्विटी शेअर्स जारी करण्यात आले. हे शेअर्स जारी करून उभी केलेली रक्कम कर्जाची परतफेड करण्यासाठी, खेळत्या भांडवलाची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी, आयपीओचा खर्च आणि सामान्य कॉर्पोरेट उद्देशांसाठी वापरली जाणार आहे.

कंपनीची माहिती
काका इंडस्ट्रीज पीव्हीसी दरवाजे, पीव्हीसी किचन कॅबिनेट आणि फर्निचर, यूपीव्हीसी विंडोज प्रोफाइल आणि वुड पॉलिमर कंपोझिट तयार करते. ही कंपनी सुमारे चार वर्षांपूर्वी 2019 मध्ये सुरू करण्यात आली होती. गुजरातच्या गांधीनगर जिल्ह्यातील जाक गावात कंपनीचे तीन उत्पादन प्रकल्प आहेत. कंपनीच्या डिस्ट्रिब्युशन नेटवर्कमध्ये तेलंगणातील गागीलपूर, उत्तर प्रदेशातील दादरी आणि गुजरातमधील सुरत येथे डेपो आहेत.

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल सांगायचं झालं तर त्यांचा नफा सातत्यानं वाढत आहे. आर्थिक वर्ष 2020 मध्ये, कंपनीचा निव्वळ नफा 1.41 कोटी रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्षात वाढून 3.02 कोटी रुपये झाला. यानंतर, आर्थिक वर्ष 2022 मध्ये नफा 4.98 कोटी रुपयांपर्यंत वाढला आणि नंतर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये तो 7.18 कोटी रुपयांवर गेला.

(टीप- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार आणि तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Kaka IPO Listing makes a stunning entry doubles investors money in IPO on the first day sme sector know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.