Lokmat Money >शेअर बाजार > Kalana Ispat IPO Listing: एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान

Kalana Ispat IPO Listing: एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान

Kalana Ispat IPO Listing : आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद देत ५९ पटींपेक्षा अधिक बोली लावली. आयपीओ अंतर्गत ६६ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2024 10:50 AM2024-09-26T10:50:43+5:302024-09-26T10:51:01+5:30

Kalana Ispat IPO Listing : आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद देत ५९ पटींपेक्षा अधिक बोली लावली. आयपीओ अंतर्गत ६६ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले.

Kalana Ispat IPO Listing Upper circuit to share on listing day But big loss for IPO investors | Kalana Ispat IPO Listing: एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान

Kalana Ispat IPO Listing: एन्ट्री करताच 'या' शेअरला अपर सर्किट; पण IPO गुंतवणूकदारांना मोठं नुकसान

Kalana Ispat IPO Listing: अनेक ग्रेडच्या बिलेटची निर्मिती करणाऱ्या कलाना स्टीलच्या शेअर्सनं आज एनएसई एसएमई प्लॅटफॉर्मवर मोठ्या डिस्काऊंटेड प्राईजवर एन्ट्री घेतली. त्याच्या आयपीओला किरकोळ गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद देत ५९ पटींपेक्षा अधिक बोली लावली. आयपीओ अंतर्गत ६६ रुपयांच्या भावाने शेअर्स जारी करण्यात आले. 

आज एनएसई एसएमईवर तो ४५.१५ रुपयांवर पोहोचला आहे, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना कोणताही लिस्टिंग गेन मिळाला नाही, परंतु लिस्टिंगवरील त्यांचे भांडवल ३१.५९ टक्क्यांनी घटले. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये वाढ झाली. कंपनीच्या शेअरला ४७.४० रुपयांचं अपर (Kalana Ispat Share Price) सर्किट लागलं, परंतु आयपीओ गुंतवणूकदार अजूनही २८.१८ टक्क्यांच्या नुकसानीत आहेत.

Kalana Ispat IPO ला मिळालेला मोठा प्रतिसाद

कलाना इस्पातच्या आयपीओसाठी १९ ते २३ सप्टेंबर दरम्यान गुंतवणूक करता येणार होती. हा आयपीओ ३२.५९ कोटी रुपयांचा होता. किरकोळ गुंतवणूकदारांच्या जोरावर या आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्तम प्रतिसाद मिळाला आणि तो ५९.९२ पट ओव्हरबाय झाला. यामध्ये किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला अर्धा हिस्सा ७४.५४ पट सबस्क्राइब झाला. या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ४९.३८ लाख नवे शेअर्स जारी करण्यात आले. या रकमेचा वापर ४ मेगावॅट डीसी आणि ३.५ मेगावॅट एसी ग्राऊंड माउंटेड सौर ऊर्जा प्रकल्प उभारणं, रोलिंग मिल सेटअप आणि उपकरणं तसंच यंत्रसामुग्री खरेदी करण्यासाठी आणि सामान्य कॉर्पोरेट कामांसाठी केला जाणार आहे.

कंपनीबद्दल माहिती

कलाना इस्पात ऑक्टोबर २०१२ मध्ये सुरू झाली असून एमएस बिलेट्स आणि अलॉय स्टील बिलेट्सची निर्मिती करते. त्याची वार्षिक उत्पादन क्षमता ३८,००० टन आहे. सप्टेंबर २०२४ पर्यंत, कंपनीत पेरोलवर १५ कर्मचारी आणि तीन प्रमुख व्यवस्थापकीय व्यक्ती आहेत. याशिवाय कर्मचाऱ्यांची गरज भासल्यास उत्पादनाच्या गरजेनुसार तात्पुरत्या स्वरूपात सेवा एजन्सीकडून मनुष्यबळाची मागणी केली जाते. 

कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर, आर्थिक वर्ष २०२१ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा १३.६२ लाख रुपये होता, जो आर्थिक वर्ष २०२२ मध्ये किरकोळ वाढून १३.६६ लाख रुपये झाला परंतु आर्थिक वर्ष २०२३ मध्ये तो ५०.०९ लाख रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.३७ कोटी रुपये झाला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक १९ टक्क्यांहून ७३.९४ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Kalana Ispat IPO Listing Upper circuit to share on listing day But big loss for IPO investors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.