Join us  

Kalyan Jewellers Share : ८०० रुपयांपार जाऊ शकतो 'या' ज्वेलरचा शेअर, २ वर्षांत ८ पटींनी झालीये वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 12:39 PM

Kalyan Jewellers Share : काही शेअर्स असे आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. तर काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. आज आपण अशाच एका शेअर बद्दल जाणून  घेणारोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना २ वर्षांत ८ पट परतावा दिलाय.

Kalyan Jewellers Share : काही शेअर्स असे आहेत, ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. तर काही शेअर्स असेही आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचं नुकसानही केलंय. आज आपण अशाच एका शेअर बद्दल जाणून  घेणारोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना २ वर्षांत ८ पट परतावा दिलाय. हा शेअर आहे, कल्याण ज्वेलर्स यांचा. 

कल्याण ज्वेलर्सचा शेअर गुरुवारी कामकाजादरम्यान ४ टक्क्यांनी वधारून ६८३ रुपयांवर पोहोचला. कल्याण ज्वेलर्सच्या शेअरनं ५२ आठवड्यांचा उच्चांक गाठला आहे. ग्लोबल ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीनं कंपनीच्या शेअरबाबत सकारात्मक भूमिका कायम ठेवली असून, त्यानंतर कल्याण ज्वेलर्सच्या शेअरमध्ये ही तेजी दिसून आली आहे. कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्समध्ये आणखी वाढ दिसू शकते, असं ब्रोकरेज हाऊसचं म्हणणं आहे. कंपनीचे शेअर्स ८०० रुपयांच्या पुढे जाऊ शकतात, असंही त्यांनी म्हटलंय.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

परदेशी ब्रोकरेज हाऊस एचएसबीसीनं कल्याण ज्वेलर्सचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिलाय. ब्रोकरेज हाऊसनं कंपनीच्या शेअर्सना बाय रेटिंग दिलं आहे. याशिवाय त्यांनी कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्सची टार्गेट प्राईज ८१० रुपये ठेवलीये. एचएसबीसीनं यापूर्वी कल्याण ज्वेलर्सच्या शेअर्ससाठी ६०० रुपयांचं टार्गेट ठेवलं होतं. कल्याण ज्वेलर्सचा शेअर बुधवारी ६५६.६० रुपयांवर बंद झाला. या पातळीवरून कंपनीच्या शेअर्समध्ये जवळपास २३ टक्क्यांची वाढ पाहायला मिळू शकते. कल्याण ज्वेलर्सच्या शेअरचा ५२ आठवड्यांतील नीचांकी स्तर २०२.६० रुपये आहे.

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारपैसा