होल्डिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कामा होल्डिंग्स लिमिटेडचा शेअर (Kama Holdings Ltd share) पुन्हा एकदा 52-आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर सोमवारी 7% अर्थात 1,254.7 रुपयांनी वधारून 16200 रुपयांवर पोहोचला होता.
यापूर्वी कामा होल्डिंगचा शेअर 1 सप्टेंबर आणि 30 ऑगस्टला 52-आठवड्यांतील नव्या उच्चांकावर पोहोचला होता. याशिवाय, गेल्या आठवड्यातच कामा होल्डिंग्सच्या शेअरने 31 ऑगस्टला 82 रुपये प्रति शेअरवर एक्स-डिव्हिडेंड व्यवहार केला होता. आता नुकतेच कंपनीने 1 सप्टेंबर 2023 रोजी 4:1 रेशोमध्ये बोनस शेअरची घोषणा केली आहे.
कामा होल्डिंग्सने 1 सप्टेंबर, 2023 रोजी बोनस देण्यासंदर्भात घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी कामाच्या एक्सचेन्ज फायलिंगनुसार, "संचालक मंडळाने सेबीच्या नियमानुसार, आयोजित बैठकीत इतर विषयांवरील चर्चेसोबतच 10 रुपयांच्या 4 इक्विटी शेअरच्या रेशोमध्ये बोनस इश्यूवर मंजुरी दिली आहे.''
(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)