Join us  

4 वर 1 बोनस शेअर देणार कंपनी, एकाच दिवसात ₹1254 नी वधारला स्टॉक! गुंतवणूकदार मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2023 8:11 PM

कंपनीचा शेअर सोमवारी  7% अर्थात 1,254.7 रुपयांनी वधारून 16200 रुपयांवर पोहोचला होता...

होल्डिंग सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कामा होल्डिंग्स लिमिटेडचा शेअर (Kama Holdings Ltd share) पुन्हा एकदा 52-आठवड्यांतील उच्चांकावर पोहोचला आहे. कंपनीचा शेअर सोमवारी  7% अर्थात 1,254.7 रुपयांनी वधारून 16200 रुपयांवर पोहोचला होता. 

यापूर्वी कामा होल्डिंगचा शेअर 1 सप्टेंबर आणि 30 ऑगस्टला 52-आठवड्यांतील नव्या उच्चांकावर पोहोचला होता. याशिवाय, गेल्या आठवड्यातच कामा होल्डिंग्सच्या शेअरने 31 ऑगस्टला 82 रुपये प्रति शेअरवर एक्स-डिव्हिडेंड व्यवहार केला होता. आता नुकतेच कंपनीने 1 सप्टेंबर 2023 रोजी 4:1 रेशोमध्ये बोनस शेअरची घोषणा केली आहे.

कामा होल्डिंग्सने 1 सप्टेंबर, 2023 रोजी बोनस देण्यासंदर्भात घोषणा केली आहे. 1 सप्टेंबर 2023 रोजी कामाच्या एक्सचेन्ज फायलिंगनुसार, "संचालक मंडळाने सेबीच्या नियमानुसार, आयोजित बैठकीत इतर विषयांवरील चर्चेसोबतच 10 रुपयांच्या 4 इक्विटी शेअरच्या रेशोमध्ये बोनस इश्यूवर मंजुरी दिली आहे.''

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

 

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारगुंतवणूक