Kataria Industries IPO : कटारिया इंडस्ट्रीज या छोट्या कंपनीनं शेअर बाजारात दमदार सुरुवात केली आहे. कंपनीच्या शेअर्सनी पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. कटारिया इंडस्ट्रीजचा शेअर ९०% प्रीमियमसह १८२.४० रुपयांवर लिस्ट झाला आहे. आयपीओमध्ये कंपनीच्या शेअरची किंमत ९६ रुपये होती. कटारिया इंडस्ट्रीजचा आयपीओ १६ जुलै २०२४ रोजी सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला आणि तो १९ जुलैपर्यंत खुला होता. कटारिया इंडस्ट्रीजची एकूण पब्लिक इश्यू साईज ५४.५८ कोटी रुपये होती.
९० टक्के प्रीमिअमसह लिस्टिंग
कंपनीचे शेअर्स ९० टक्के प्रीमिअमसह अपर सर्किटवर पोहोचले. लिस्टिंगनंतर कटारिया इंडस्ट्रीजचा शेअर ५ टक्क्यांच्या अप्पर सर्किटसह १९१.५० रुपयांवर पोहोचला आहे. कटारिया इंडस्ट्रीजचा शेअर ९६ रुपयांच्या इश्यू प्राइसच्या तुलनेत जवळपास १०० टक्क्यांनी वधारला आहे. म्हणजेच लिस्टिंगच्या दिवशी कंपनीच्या शेअर्सनी गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केलेत. कटारिया इंडस्ट्रीजचे शेअर्स नॅशनल स्टॉक एक्स्चेंजच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर लिस्टेड आहेत.
आयपीओ ३९३ पटींहून अधिक सब्सक्राइब
कटारिया इंडस्ट्रीजचा आयपीओ एकूण ३९३.८७ पट सब्सक्राइब झालाय. कंपनीच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांचा कोटा २७४.६१ पट सब्सक्राइब झाला होता. तर आयपीओमध्ये नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (NII) ९७०.१७ पट सबस्क्राइब झाला होता. कंपनीच्या आयपीओमध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्सचा (क्यूआयबी) कोटा १७१.०४ पट सब्सक्राइब करण्यात आला होता. कटारिया इंडस्ट्रीजच्या आयपीओमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांना फक्त १ लॉटसाठी गुंतवणूक करता येणार होती. आयपीओमध्ये एका लॉटमध्ये १२०० शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणूकदारांना ११५२०० रुपयांची गुंतवणूक करावी लागणार आहे.
कटारिया इंडस्ट्रीज आपल्या आयपीओमधून उभारलेल्या पैशांचा वापर भांडवली खर्च, कर्जाची परतफेड, प्लांट आणि मशिनरीच्या सामान्य कॉर्पोरेट हेतूसाठी करेल. सुनील कटारिया, अरुण कटारिया आणि अनुप कटारिया हे कंपनीचे प्रवर्तक आहेत.
(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)