Join us  

Kaycee Industries Ltd share: एकावर ४ शेअर मोफत देणार 'ही' कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; आज ₹१००० ची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 11:28 AM

Kaycee Industries Ltd share: कंपनीच्या शेअरला आज २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांनी म्हणजे १०३४.९० रुपयांनी वधारून ५२७८०.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला.

Kaycee Industries Ltd share: स्मॉल कॅप इलेक्ट्रिकल इक्विपमेंट कंपनी केसी इंडस्ट्रीजचे शेअर्स आज फोकसमध्ये आहे. कंपनीच्या शेअरला आज २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. केसी इंडस्ट्रीजचा शेअर आज २ टक्क्यांनी म्हणजे १०३४.९० रुपयांनी वधारून ५२७८०.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. शेअर्समधील या तेजीमागे बोनस आणि स्टॉक स्प्लिटसाठी रेकॉर्ड डेटची घोषणा आहे. खरं तर, केसी इंडस्ट्रीज लिमिटेडनं १:१० स्टॉक स्प्लिट आणि ४:१ बोनस शेअरसाठी रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. 

शेअरबद्दल अधिक माहिती 

शेअर बाजाराला दिलेल्या माहितीनुसार, कंपनीने ६ जुलै २०२४ रोजी १:१० स्टॉक स्प्लिट आणि ४:१ बोनस इश्यूची रेकॉर्ड डेट निश्चित केली आहे. केसी इंडस्ट्रीजच्या संचालक मंडळाच्या सदस्यानं २८ मे २०२४ रोजी ६० रुपये प्रति शेअर अंतिम लाभांश आणि ४० रुपये प्रति शेअर विशेष लाभांश देण्याची शिफारस केली होती. केसी इंडस्ट्रीजचे मार्केट कॅप ३३५ कोटी रुपये आहे. 

स्टॉक स्टेटस 

केसी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं गेल्या ३ महिन्यांतच १९७ टक्के आकर्षक परतावा दिला असून गेल्या २ वर्षांत १३५७ टक्के परतावा दिला आहे. केसी इंडस्ट्रीजच्या शेअर्सनं या वर्षी YTD मध्ये आतापर्यंत १८५ टक्के परतावा दिलाय. गेल्या १ वर्षात हा शेअर ३२६ टक्क्यांनी वाढलाय आणि गेल्या ३ वर्षात १३०८ टक्क्यांनी वाढला आहे. बीएसईवर केसी इंडस्ट्रीजच्या शेअरची ट्रेडिंग प्राइस ५२७८०.४० रुपये प्रति शेअर आहे. बीएसईवर केसी इंडस्ट्रीजच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्चांकी किंमत ५३,८३६.१० रुपये प्रति शेअर आणि ५२ आठवड्यांची नीचांकी किंमत १०,४००.०० रुपये प्रति शेअर आहे. 

कंपनीच्या व्यवसायाबाबत माहिती 

केसी इंडस्ट्रीज लिमिटेड ही भारतातील विद्युत उपकरणांच्या निर्मिती आणि व्यवसायात सक्रिय आहे. यामध्ये रोटरी, मायक्रो, टॉगल, कॅम, लिमिट, रोटरी टॉगल, ब्रेकर कंट्रोल, न्यू कॅम, स्ट्रोक मापन यंत्र आणि रस्ता मापन काउंटर, वॉटर मीटर, लग्ज, टाइमर, डिजी काउंट, पीबी अँड लॅम्प, सबमर्सिबल केबल आणि अर्थिंग डिव्हाइस आणि रिले स्विच आदी सुविधा उपलब्ध आहेत. केसी इंडस्ट्रीज ही आपली उत्पादने निर्यात करते. ही १९४२ मध्ये सुरू झालेली कंपनी असून ती मुंबईत स्थित आहे. केसी इंडस्ट्रीज लिमिटेड ही साल्झर इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडची उपकंपनी आहे. 

(टीप : यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक