Join us  

IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 1:52 PM

Kaynes Technology Share Price : या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. कंपनीचा शेअर शुक्रवारी १८ टक्क्यांनी वधारून ३,०४९.७५ रुपयांवर पोहोचला.

Kaynes Technology Share Price : इडस्ट्रीयल प्रोडक्ट इंडस्ट्रीशी (Industrial Product Industry) संबंधित कायन्स टेक्नॉलॉजी (Kaynes Technology) या कंपनीच्या शेअर्समध्ये शुक्रवारी तेजी दिसून आली. कायन्स टेक्नॉलॉजीचा शेअर शुक्रवारी १८ टक्क्यांनी वधारून ३,०४९.७५ रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स ३२४८ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या जवळ पोहोचला.  

मार्च २०२४ तिमाहीच्या दमदार नफ्यानंतर कायन्स टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे. मार्च २०२४ तिमाहीत कंपनीचा नफा ९७ टक्क्यांनी वाढून ८१ कोटी रुपये झाला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत कायन्स टेक्नॉलॉजीजला ४१ कोटी रुपयांचा नफा झाला होता. 

शेअरमध्ये १८ टक्क्यांची वाढ 

औद्योगिक उत्पादन उद्योगाशी संबंधित कायन्स टेक्नॉलॉजी या कंपनीच्या शेअर्सनं तेजी घेतली आहे. कायन्स टेक्नॉलॉजीचा (Kaynes Technology) शेअर शुक्रवारी १८ टक्क्यांनी वधारून ३,०४९.७५ रुपयांवर पोहोचला. कंपनीचे शेअर्स ३२४८ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ आले आहेत. मार्च २०२४ तिमाहीच्या दमदार नफ्यानंतर कायन्स टेक्नॉलॉजीजच्या शेअर्समध्ये वाढ झाली आहे.  

मार्च २०२४ तिमाहीत कंपनीचा नफा ९७ टक्क्यांनी वाढून ८१ कोटी रुपये झालाय. गेल्या वर्षी याच कालावधीत कायन्स टेक्नॉलॉजीजला ४१ कोटी रुपयांचा नफा झाला होता.

 

वर्षभरात १६० टक्क्यांहून अधिक वाढ 

गेल्या वर्षभरात कंपनीच्या शेअरमध्ये १६० टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. १७ मे २०२३ रोजी कंपनीचा शेअर ११६५.८५ रुपयांवर होता. कायन्स टेक्नॉलॉजीचा (Kaynes Technology) शेअर १७ मे २०२४ रोजी ३०४९.७५ रुपयांवर पोहोचला. तर कंपनीच्या शेअरमध्ये गेल्या ६ महिन्यांत २३ टक्क्यांची वाढ झाली आहे. कायन्स टेक्नॉलॉजीजमध्ये प्रवर्तकांचा हिस्सा ५७.८३ टक्के, तर सार्वजनिक हिस्सा ४२.१७ टक्के आहे. आर्थिक वर्ष 2024 च्या तिसऱ्या तिमाहीत कायन्स टेक्नॉलॉजीजची ऑर्डर बुक ३७८९ कोटी रुपये होती, जी चौथ्या तिमाहीत वाढून ४११५ कोटी रुपये झाली आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंग