Lokmat Money >शेअर बाजार > पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

या आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ येणार असून कमाईची उत्तम संधी आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2023 12:46 PM2023-09-11T12:46:31+5:302023-09-11T12:46:49+5:30

या आठवड्यात चार कंपन्यांचे आयपीओ येणार असून कमाईची उत्तम संधी आहे.

Keep Money Ready 4 Earnings Opportunities from IPOs When and how much money to invest See details RR Kabel Samhi Hotels Zaggle Chavda Infra | पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

पैसे तयार ठेवा, ४ IPO मधून मिळणार कमाईची संधी; कधी अन् किती पैसे गुंतवायचे? पाहा डिटेल्स

जर तुम्हीही शेअर बाजारातगुंतवणूक करत असाल तर या आठवड्यात आयपीओद्वारे कमाई करण्याची उत्तम संधी आहे. या आठवड्यात ४ कंपन्या त्यांचे आयपीओ घेऊन येत आहेत. चांगल्या आयपीओच्या माध्यमातून अनेकदा गुंतवणूकदारांना मोठा नफा मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदार आयपीओची वाट पाहत असतात. या आठवड्यात ज्या ४ कंपन्यांचे आयपीओ येत आहे त्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत - आर आर काबेल (RR Kabel), समही हॉटेल्स (Samhi Hotels), झॅगल प्रीपेड ओशियन (Zaggle Prepaid Ocean Service), चावडा इन्फ्रा (Chavda Infra).

या आयपीओंसाठी केव्हा गुंतवणूकीची संधी मिळेल ते पाहू. आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यासाठी किमान किती रक्कम खर्च करावी लागेल? या आयपीओचा आकार किती आहे हे देखील पाहूया.

RR Kabel
ही कंपनी इलेक्ट्रिकल उत्पादनं बनवते. या कंपनीचा IPO १३ सप्टेंबर रोजी उघडेल. यासाठी १५ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येणार आहे. कंपनीने प्रति शेअर इश्यू किंमत ९८३-१०३५ रुपये ठेवली आहे. एका लॉटमध्ये १४ शेअर्स ठेवण्यात आलेत. जर तुम्हाला यासाठी किमान १४४९० रुपये गुंतवावे लागतील. हा आयपीओ १९६३ कोटी रुपयांचा आहे.

SAMHI Hotels
हा IPO १४ सप्टेंबर रोजी उघडेल. यासाठी १८ सप्टेंबरपर्यंत बोली लावता येईल. यातून १४०० कोटी रुपये उभारण्याची कंपनीची योजना आहे. यामध्ये फ्रेश इश्यू आणि ओएफएस दोन्ही शेअर्सचा समावेश आहे. या आयपीओच्या जारी किमतीबद्दल सध्या कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

Zaggle Prepaid Ocean Service
ही फिनटेक कंपनी आहे. या कंपनीचा आयपीओही १४ सप्टेंबरला उघडेल. कंपनी या आयपीओच्या माध्यमातून ५६३ कोटी रुपये उभारण्याचा विचार करत आहे. यात ३९२ कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू आणि १७१ कोटी रुपयांचे ऑफर फॉर सेल असेल.

Chavda Infra
त्याचा आयपीओ १२ सप्टेंबर रोजी उघडेल. कंपनी आयपीओद्वारे ४३.२६ कोटी रुपये उभारणार आहे. आयपीओचा प्राईज बँड ६०-६५ रुपये निश्चित करण्यात आलाय. हा आयपीओ पूर्णपणे फ्रेश इश्यूवर आधारित असेल. यासाठी १४ सप्टेंबरपर्यंतच बोली लावता येणार आहे.

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Keep Money Ready 4 Earnings Opportunities from IPOs When and how much money to invest See details RR Kabel Samhi Hotels Zaggle Chavda Infra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.