Join us  

पैसे तयार ठेवा! २०२४ मध्ये येताहेत 'या' दिग्गज कंपन्यांचे IPO, गुंतवणूकीची आहे उत्तम संधी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 02, 2024 10:16 AM

२०२३ हे वर्ष आयपीओसाठी जबरदस्त राहीलं होतं. या कालावधीत, ८० टक्क्यांहून अधिक आयपीओ प्रीमियमवर लिस्ट झाले होते.

IPO updates: २०२३ हे वर्ष आयपीओसाठी जबरदस्त राहीलं होतं. या कालावधीत, ८० टक्क्यांहून अधिक आयपीओ प्रीमियमवर लिस्ट झाले होते. जर तुम्ही गेल्या वर्षी कोणत्याही कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करू शकला नसाल तर काळजी करण्याची गरज नाही. यावर्षीही अनेक कंपन्यांचे आयपीओ येत आहेत. स्विगी (Swiggy), फर्स्ट क्राय (FirstCry), ओला इलेक्ट्रिक (Ola Electric), ओयो (Oyo) सारख्या कंपन्या प्राथमिक बाजारातून पैसे उभारणार आहेत. म्हणजे गुंतवणूकदारांना यात गुंतवणूकीची संधी मिळणार आहे.गेल्या वर्षी २०० पेक्षा अधिक आयपीओशेअर बाजारावर लक्ष ठेवणाऱ्या तज्ज्ञांच्या मते, गेल्या वर्षी एसएमई विभागात १७३ आयपीओ आणि मेन बोर्डमध्ये ५२ आयपीओ लॉन्च करण्यात आले होते. यापैकी बहुतेक प्रीमियमवर लिस्ट झाले. टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ जवळपास २ दशकांनंतर आला. टाटा टेक्नॉलॉजीनंही आपल्या गुंतवणूकदारांना निराश केलं नाही.या आयपीओवर लक्षयावर्षी येणाऱ्या आयपीओंपैकी गुंतवणूकदारांची सर्वाधिक नजर फर्स्ट क्रायच्या आयपीओवर असणार आहे. कंपनीनं आपला ड्राफ्ट पेपर सेबीकडे सादर केलाय. कंपनी आयपीओद्वारे नव्या इश्यूद्वारे १८१६ कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच वेळी, विद्यमान भागधारक ५,४३,९१,५९२ शेअर्स विकू शकतात.ओला इलेक्ट्रिकचा आयपीओओला इलेक्ट्रिक ही भारतातील इलेक्ट्रिक दुचाकी बनवणारी आघाडीची कंपनी आहे. या वर्षी कंपनीचा आयपीओ येऊ शकतो. ओला इलेक्ट्रिक फ्रेश इश्यूद्वारे ५५०० कोटी रुपये उभारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याच वेळी प्रवर्तक आणि गुंतवणूकदार ९.५२ कोटी शेअर्स विकू शकतात.स्विगीकडूनही अपेक्षारिपोर्ट्सनुसार, फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्म स्विगी आयपीओद्वारे (Swiggy IPO) १ बिलियन डॉलर्स उभारण्याचा प्रयत्न करेल. हेल्थ व्हिस्टा इंडियाचा आयपीओ नवीन वर्षात येऊ शकतो. सेबीने कंपनीला यापूर्वीच ग्रीन सिग्नल दिला आहे.(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगसेबीशेअर बाजार