Lokmat Money >शेअर बाजार > ₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम

₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम

शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या तेजीमध्ये काही दिवाळखोरीतील कंपन्यांचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे वाढत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2024 09:14 AM2024-03-11T09:14:48+5:302024-03-11T09:15:22+5:30

शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या तेजीमध्ये काही दिवाळखोरीतील कंपन्यांचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे वाढत आहेत.

Kishore Biyani Future Retail Ltd share fell from rs 560 to rs 2 now investors jump know details | ₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम

₹५६० वरुन आपटून ₹२ वर आला 'हा' शेअर, आता गुंतवणूकदारांच्या उड्या; 'या' वृत्ताचा परिणाम

Future Retail Ltd share: शेअर बाजार दररोज नवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. या तेजीमध्ये काही दिवाळखोरीतील कंपन्यांचे शेअर्सही रॉकेटप्रमाणे वाढत आहेत. असाच एक शेअर फ्युचर रिटेल या फ्युचर ग्रुपच्या रिटेल कंपनीचा आहे. गुरुवारी या कंपनीच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली. आठवड्याच्या शेवटच्या व्यवहाराच्या दिवशी या शेअरमध्ये 4 टक्क्यांहून अधिक वाढ झाली. सोमवारीही कंपनीच्या शेअरमध्ये तब्बल 4.55 टक्क्यांची वाढ होऊन तो 2.30 रुपयांवर पोहोचला.
 

फ्यूचर रिटेल लिमिटेडचे ​​शेअर्स गुरूवारी 2.07 रुपयांच्या आधीच्या किमतीच्या तुलनेत 4.83% वाढीसह 2.17 रुपयांवर पोहोचले. या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर 3.93 रुपये आहे. ही किंमत 20 जुलै 2024 रोजी होती. गेल्या 7 मार्च रोजी शेअरची किंमत 1.98 रुपये होती. या शेअरची किंमत 5 वर्षांपूर्वी 560 रुपये होती. या संदर्भात, स्टॉक 99 टक्क्यांनी घसरला आहे.
 

स्पेसमंत्रानं बिडमध्ये सुधारणा केली
 

फ्युचर रिटेलच्या रिझोल्यूशन प्लॅनमध्ये स्पेसमंत्र या एकमेव कंपनीनं बोली लावली आहे. दिवाळखोर फर्मचं लिक्विडेशन टाळण्यासाठी तिनं मागील बोली सुधारित केली आहे. अलीकडे, मीडिया रिपोर्ट्समध्ये असं म्हटलंय आहे की नवीन बोली मागील बोलीपेक्षा खूप अधिक आहे आणि कंपनीने प्रशासक, तसंच कमिटी ऑफ क्रेडिटर्स (CoC) यांना संपूर्ण प्रक्रियेवर पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. बँक ऑफ न्यूयॉर्क मेलॉनचा CoC मध्ये सर्वाधिक मतदानाचा हिस्सा 21.18% आहे, त्यानंतर युनियन बँक ऑफ इंडियाचा 9.17% आणि बँक ऑफ बडोदाचा 8.95% आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही, कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Kishore Biyani Future Retail Ltd share fell from rs 560 to rs 2 now investors jump know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.