Join us

KP Energy Share: 'या' एनर्जी कंपनीला मिळाली मोठी ऑर्डर; शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 1:53 PM

KP Energy Share: आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी, कंपनीचे शेअर्स 5% च्या अपर सर्किटवर पोहोचले. यापूर्वी सोमवारी हा शेअर 390.35 रुपयांवर बंद झाला होता.

KP Energy Share: केपी एनर्जी लिमिटेड या ऊर्जा क्षेत्राशी संबंधित कंपनीला विंड एनर्जीची एक मोठी ऑर्डर मिळाली आहे. या आदेशानंतर गुंतवणूकदार केपी एनर्जीच्या शेअर्सवर तुटून पडल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारी, आठवड्याच्या दुसऱ्या ट्रेडिंग दिवशी, KP Energy चे शेअर्स 5% च्या अपर सर्किटवर पोहोचले. यापूर्वी सोमवारी हा शेअर 390.35 रुपयांवर बंद झाला होता. 

26 फेब्रुवारी 2024 रोजी शेअरची किंमत 465 रुपये होती. हा या शेअरचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर आहे. मे 2023 मध्ये शेअरची किंमत 58.61 रुपये होती. हा स्टॉकचा 52 आठवड्यांचा नीचांकी स्तर आहे. एका वर्षाच्या कालावधीत, या शेअरनं गुंतवणूकदारांना 550% पेक्षा जास्त परतावा दिलाय. 

ऑर्डर डिटेल्स 

KP Energy Ltd ने स्टॉक एक्सचेंज फाइलिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार त्यांना भटवारी टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडकडून 9MW विंड एनर्जी प्रकल्पाच्या बांधकामासाठी नवीन ऑर्डर मिळाली आहे. हा प्रकल्प गुजरातमध्ये असलेल्या विंड-सोलर हायब्रिड पॉवर प्रोजेक्टचा एक घटक आहे. हा प्रकल्प स्टेट ट्रान्समिशन युटिलिटी (STU) नेटवर्कचा एक भाग असून तो कॅप्टिव्ह पॉवर प्रोजेक्ट अंतर्गत येतो. हा प्रकल्प आर्थिक वर्ष 2024-2025 मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे आणि यात टर्नकी योजनेच्या विकासासाठी सप्लाय आणि सर्व्हिसेस दोघांचाही समावेश आहे. 

(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक