Join us

'या' IPO ची शेअर बाजारात धमाकेदार लिस्टिंग, पहिल्याच दिवशी ४५% चा फायदा; लागलं अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2024 11:40 AM

KP Green Engineering IPO Listing: गेल्या काही दिवसांपासून ठरावीक अपवाद वगळता बहुतांश आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आता शेअर बाजारात या आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग झालंय.

KP Green Engineering IPO Listing: गेल्या काही दिवसांपासून ठरावीक अपवाद वगळता बहुतांश आयपीओंनी गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. आता शेअर बाजारात केपी ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या आयपीओचं जबरदस्त लिस्टिंग झालंय. कंपनी शेअर बाजारात 38.88 टक्के प्रीमियमसह 200 रुपयांवर लिस्ट झाली. काही वेळातच कंपनीच्या शेअर्सना 5 टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. त्यानंतर शेअरची किंमत 210 रुपयांपर्यंत पोहोचली. कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांनी आतापर्यंत 45.83 टक्के नफा कमावला आहे. 

केपी ग्रीन एनर्जी लिमिटेडचा (KP Green Energy Limited) आयपीओ 15 मार्च रोजी उघडण्यात आला. दरम्यान 19 मार्चपर्यंत यात गुंतवणूकीची संधी होती. या कालावधीत आयपीओला 36 पटींपेक्षा अधिक सबस्क्रिप्शन मिळालं. हा आयपीओ अखेरच्या दिवशी सर्वाधिक 29.50 पट सबस्क्राईब झाला होता. 

काय होता प्राईज बँड? 

कंपनीच्या आयपीओचा प्राइस बँड 137 ते 144 रुपये प्रति शेअर निश्चित करण्यात आला होता. तर कंपनीनं 1000 शेअर्सचा एक लॉट तयार केला होता. त्यामुळे गुंतवणूकदारांना किमान 1,44,000 रुपयांची गुंतवणूक करावी लागली होती. 

कंपनीचा आयपीओ 13 मार्च रोजी अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होता. त्यानंतर कंपनीनं अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमातून 54 कोटी रुपये उभे केले होते. कंपनीच्या आयपीओची साईज 189.50 कोटी रुपये होती. कंपनीनं आयपीओद्वारे 131.60 लाख नवीन शेअर जारी केले आहेत. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगगुंतवणूक