Join us

शेअर असावा तर असा...! 3 वर्षांत दिला 2756% परतावा, गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 6:13 PM

स्टॉकने बीएसईवर 935 रुपयांची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीही गाठली. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 3,294.34 कोटी रुपये एढे आहे.

भारतीय शेअर बाजार सुरुवातीच्या व्यवहारात घसरणीसह ट्रेड करत होता. सेंसेक्स 232 अंकांनी घसरून 65,019 वर आणि निफ्टी 77 अंकांच्या घसरणीसह 19,309 वर ट्रेड करत होताना दिसला. मात्र यातच, केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरमध्ये 5.47 टक्क्यांची जबरदस्त उसळी दिसून आली. याशिवाय, स्टॉकने बीएसईवर 935 रुपयांची 52 आठवड्यांतील उच्चांकी पातळीही गाठली. सध्या कंपनीचे बाजार भांडवल 3,294.34 कोटी रुपये एढे आहे. 

तांत्रिकदृष्ट्या 25 ऑगस्टपर्यंत या शेअरचे 200-दिवसांचे मूव्हिंग अॅव्हरेज (DMA) 593.74 रुपये एवढे होते, तर 50-DMA 795.04 रुपयांवर होता. या शेअरची सध्याची किंमत 914.85 रुपये एवढी आहे. सध्याच्या क्रॉसओव्हरमध्ये, 50-DMA ने 200-DMA पार केले आहे. जो दीर्घकाळात सातत्यपूर्ण तेजीचा संकेत देतो.

स्मॉल-कॅप पॉवर जनरेशन स्टॉकमध्ये गुंतवणूक करण्याची इच्छा असलेल्या लोकांसाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो. या कंपनीची स्थापना 2008 मध्ये झाली आहे. केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेड सौर ऊर्जा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. कंपनीला गुजरात ऊर्जा विकास एजन्सीकडून (GEDA) पवन-सौर हायब्रिड पॉवर प्रोजेक्टसाठी कमीशन सर्टिफिकेट मिळाले आहे. या प्रोजेक्टची एकूण क्षमता 4.10MW एवढी आहे. यात 2.10MW पवन ऊर्जा आणि 2MWdc सौर ऊर्जा आहे.

गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत पहिल्या तिमाहीत कंपनीचे उत्पन्न 54.91% ने वाढून रु. 189 कोटींवर पोहोचले आहे. नुकतेच कमीशन करण्यात आलेल्या प्रोजेक्टपासून कंपनीच्या रेव्हेन्यूमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. 22 ऑगस्ट 2023 रोजी कंपनीने 0.25 रुपये प्रति शेअरच्या अंतरिम लाभांश जाहीर केला होता. या स्टॉकने गेल्या 3 वर्षांत 2756% हून अधिकचा परतावा दिला आहे. या शेअरवर गुंतवणूकदारांची नजर असू शकते.

(टीप - येथे केवळ शेअरच्या परफॉर्मन्सची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.) 

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार