स्मॉलकॅप कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स सध्या फोकसमध्ये आहेत. KPI ग्रीन एनर्जीच्या शेअर्सना बुधवारी सलग तिसऱ्या दिवशी अपर सर्किट लागलं. KPI ग्रीन एनर्जीचे शेअर्स बुधवार, 24 एप्रिल रोजी 5% वाढून 2008.85 रुपयांवर आले. कंपनीच्या शेअर्सचा हा विक्रमी उच्चांक आहे. केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स गेल्या 4 वर्षांत 8 रुपयांवरून 2000 रुपयांपर्यंत वाढले आहेत. कंपनीच्या शेअर्सची 52 आठवड्यांची नीचांकी पातळी 312.70 रुपये आहे.
4 वर्षांत जबरदस्त रिटर्न
केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सने गेल्या 4 वर्षांत जबरदस्त परतावा दिलाय. 18 जून 2020 रोजी कंपनीचे शेअर्स 8 रुपयांवर होते. 24 एप्रिल 2024 रोजी KPI ग्रीन एनर्जीचे शेअर्स 2008.85 रुपयांवर पोहोचले. कंपनीच्या शेअर्सनी गेल्या 4 वर्षात गुंतवणूकदारांना 24821% चा जबरदस्त परतावा दिला. कंपनीने गेल्या 2 वर्षांत दोनदा गुंतवणूकदारांना बोनस शेअर्सही दिले आहेत. कंपनीने जानेवारी 2023 मध्ये 1:1 च्या प्रमाणात बोनस शेअर्स दिले होते. तर फेब्रुवारी 2024 मध्ये 1:2 च्या प्रमाणात बोनस शेअर्स देण्यात आले होते.
वर्षभरात 525 टक्क्यांची वाढ
एका वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये 525% पेक्षा जास्त वाढ झाली आहे. 24 एप्रिल 2023 रोजी सौर कंपनी केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स 320.53 रुपयांवर होते. 24 एप्रिल 2024 रोजी केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स 2008.85 रुपयांवर पोहोचले. त्याच वेळी, गेल्या 6 महिन्यांत, कंपनीचे शेअर्स 270% पेक्षा जास्त वाढले आहेच. 25 ऑक्टोबर 2023 रोजी कंपनीचे शेअर्स 542.57 रुपयांवर होते, जे आता 2000 रुपयांच्या पुढे गेले आहेत. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्समध्ये गेल्या एका महिन्यात सुमारे 35% वाढ झाली आहे.
(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)