Lokmat Money >शेअर बाजार > 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केलंय. आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना खटा-खट रिटर्न दिलेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2024 01:51 PM2024-06-17T13:51:18+5:302024-06-17T13:52:45+5:30

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केलंय. आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना खटा-खट रिटर्न दिलेत.

kpi green multibagger share huge Return rs 400 share crosses 1800 mark Energy share huge profit | 'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

'खटा-खट खटा-खट रिटर्न'! ₹४०० चा शेअर पोहोचला १८०० पार; 'या' Energy शेअरनं केलं मालामाल

Share Market Multibagger Stock : शेअर बाजारात असे अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुतंवणूकदारांना मालामाल केलंय. तसंच असेही अनेक शेअर्स आहेत ज्यांनी आपल्या गुंतवणूकदारांचे पैसेही बुडवलेत. परंतु आज आपण अशा एका शेअरबद्दल बोलणार आहोत ज्यानं आपल्या गुंतवणूकदारांना खटा-खट रिटर्न दिलेत. दरम्यान, भारताच्या ग्रीन एनर्जी क्षेत्रात कार्यरत असलेल्या केपीआय ग्रीन एनर्जी या स्मॉल कॅप कंपनीच्या शेअर्सनं गेल्या एका वर्षात ४३० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून १८४० रुपयांच्या पातळीवर ३२८ टक्के बंपर परतावा देऊन गुंतवणूकदारांना मालामाल केलंय. 

केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअर्सनं गुंतवणूकदारांना २९ एप्रिल २०२२ रोजी १७६ रुपयांच्या नीचांकी पातळीवरून अडीच वर्षांच्या कालावधीत ९४३ टक्के बंपर परतावा दिलाय. सुमारे ११,००० कोटी रुपयांचे मार्केट कॅप असलेल्या केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरची ५२ आठवड्यांच्या उच्चांकी पातळी २,१९० रुपये आणि ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळी ४२५ रुपये आहे.
 

काही दिवसांपासून घसरण
 

केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स गेल्या काही दिवसांपासून घसरत असून गेल्या महिनाभरात गुंतवणूकदारांना चार टक्के निगेटिव्ह रिटर्न दिले आहे. मात्र गेल्या ६ महिन्यांत केपीआय ग्रीन एनर्जी लिमिटेडच्या शेअरनं ९१८ रुपयांच्या पातळीवरून १०० टक्के परतावा देत गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय. केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स १:२ या प्रमाणात विभागले जाणार आहेत. केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सनेही बोनस शेअर्स देऊनही गुंतवणूकदारांना श्रीमंत केलंय.
 

४०० रुपयांपासून २१०० पर्यंतचा प्रवास
 

केपीआय ग्रीन एनर्जीचा शेअरनं गेल्या १ वर्षाच्या कालावधीत ४०० रुपयांच्या नीचांकी पातळीवरून २१०० रुपयांच्या पातळीपर्यंत पोहोचला होता. बोनस शेअर्स जारी झाल्यानंतर केपीआय ग्रीन एनर्जीच्या शेअर्सचं ४२७५८ रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य ३.६६ लाख रुपयांच्या गुंतवणुकीत झालंय. केपीआय ग्रीन एनर्जीचे शेअर्स स्प्लिट होणार आहेत. यानंतर १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या शेअर्सचं रूपांतर ५ रुपयांच्या फेस व्हॅल्यूच्या दोन शेअर्समध्ये केलं जाईल.

केपीआय ग्रीन एनर्जीनेही गुंतवणूकदारांना दोन टक्के लाभांश जाहीर केला आहे. १० रुपये फेस व्हॅल्यू असलेल्या शेअर्ससाठी गेल्या आर्थिक वर्षातील गुंतवणूकदारांना प्रति शेअर २० पैसे लाभांश मिळणार आहे. 
 

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: kpi green multibagger share huge Return rs 400 share crosses 1800 mark Energy share huge profit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.