Join us

KRN Heat Exchanger IPO: 'हा' IPO खुला होताच तासाभरात पूर्ण सबस्क्राइब; ग्रे मार्केटमध्ये ₹२३६ वर पोहोचला भाव; नफ्याचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2024 2:10 PM

KRN Heat Exchanger IPO: बुधवारी सुरुवातीला पहिल्या अर्ध्या तासात तो पूर्णपणे सब्सक्राइब झाला. ग्रे मार्केटमध्येही याला जोरदार मागणी असून हा शेअर १०८ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे.

KRN Heat Exchanger IPO: केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशनच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. हा आयपीओ उघडताच पूर्णपणे सबस्क्राइब झाला. केआरएन हीट एक्स्चेंजर आयपीओ उघडताच याला मोठी डिमांड दिसून आली. बुधवारी सुरुवातीला पहिल्या अर्ध्या तासात तो पूर्णपणे सब्सक्राइब झाला. ग्रे मार्केटमध्येही याला जोरदार मागणी असून हा शेअर १०८ टक्के प्रीमियमवर उपलब्ध आहे. Investorgain.com दिलेल्या माहितीनुसार, केआरएन हीट एक्स्चेंजर अँड रेफ्रिजरेशन आयपीओ ग्रे मार्केटमध्ये २३६ रुपयांच्या प्रीमियमवर उपलब्ध आहे.

काय आहेत डिटेल्स?

बीएसईच्या आकडेवारीनुसार, सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ एकूण २.३७ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला हिस्सा २.३७ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणी ४.८६ पट सब्सक्राइब झाली. तर तोपर्यंत इश्यूच्या क्यूआयबी सेगमेंटमध्ये सब्सक्रिप्शन दिसत नव्हते. सोमवार, ३० सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअर्स वाटपाला अंतिम रुप दिलं जाईल असं म्हटलं जात आहे. तर गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट करण्यचा करण्याचा प्रस्ताव आहे.

३४२ कोटींचा आयपीओ

मेनबोर्ड आयपीओ ३४२ कोटी रुपयांचा आहे. हा इश्यू बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून शुक्रवार, २७ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. आयपीओपूर्वी कंपनीनं १० अँकर गुंतवणूकदारांकडून १००.१० कोटी रुपये उभे केले आहेत. हा आयपीओ पूर्णपणे १.५५ कोटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. याची प्राईज बँड २०९ ते २२० रुपये प्रति शेअर आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी कमीत कमी लॉट साईज एक लॉटची आहे. एका लॉटमध्ये कंपनीचे ६५ शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणुकदारांसाठी आवश्यक असलेली किमान गुंतवणूक १४,३०० रुपये आहे.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :इनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार