KRN Heat Exchanger IPO : केआरएन हीट एक्स्चेंजरच्या आयपीओला गुंतवणूकदारांचा जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. आज (शुक्रवारी) कंपनीच्या आयपीओमध्ये गुंतवणूक करण्याची अखेरची संधी आहे. केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ सब्सक्रिप्शनसाठी २७ सप्टेंबरपर्यंत खुला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कंपनीचा आयपीओ ७० पटी पेक्षा अधिक सब्सक्राइब झाला आहे. केआरएन हीट एक्स्चेंजरचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये धुमाकूळ घालत आहेत. कंपनीचे शेअर्स ग्रे मार्केटमध्ये सुमारे १२५ टक्क्यांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहेत.
शेअर्स ४९० रुपयांवर लिस्ट होऊ शकतात
केआरएन हीट एक्स्चेंजरच्या आयपीओमध्ये शेअरची किंमत २२० रुपये आहे. तर ग्रे मार्केटमध्ये कंपनीचे शेअर्स २७४ रुपयांच्या प्रीमियमसह व्यवहार करत आहेत. कंपनीच्या शेअर्सचा ग्रे मार्केट प्रीमियम (जीएमपी) वाढून २७४ रुपये झालाय. जीएमपीवर नजर टाकली तर केआरएन हीट एक्स्चेंजचे शेअर्स ४९४ रुपयांच्या जवळपास लिस्ट होऊ शकतात. ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये केआरएन हीट एक्स्चेंजरचे शेअर्स मिळतील, त्यांना लिस्टिंगच्या दिवशी सुमारे १२५% नफा मिळण्याची शक्यता आहे.
काय आहेत डिटेल्स?
बीएसईच्या आकडेवारीनुसार, सब्सक्रिप्शनच्या पहिल्या दिवशी बुधवारी सकाळी १०.३० वाजेपर्यंत केआरएन हीट एक्स्चेंजरचा आयपीओ एकूण २.३७ पट सब्सक्राइब झाला. किरकोळ गुंतवणूकदारांसाठी राखीव असलेला हिस्सा २.३७ पट, तर नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्स श्रेणी ४.८६ पट सब्सक्राइब झाली. तर तोपर्यंत इश्यूच्या क्यूआयबी सेगमेंटमध्ये सब्सक्रिप्शन दिसत नव्हते. सोमवार, ३० सप्टेंबर रोजी कंपनीच्या शेअर्स वाटपाला अंतिम रुप दिलं जाईल असं म्हटलं जात आहे. तर गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट करण्यचा करण्याचा प्रस्ताव आहे.
३४२ कोटींचा आयपीओ
मेनबोर्ड आयपीओ ३४२ कोटी रुपयांचा आहे. हा इश्यू बुधवार, २५ सप्टेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी खुला झाला असून शुक्रवार, २७ सप्टेंबरपर्यंत खुला राहणार आहे. आयपीओपूर्वी कंपनीनं १० अँकर गुंतवणूकदारांकडून १००.१० कोटी रुपये उभे केले आहेत. हा आयपीओ पूर्णपणे १.५५ कोटी शेअर्सचा फ्रेश इश्यू आहे. याची प्राईज बँड २०९ ते २२० रुपये प्रति शेअर आहे. किरकोळ गुंतवणुकदारांसाठी कमीत कमी लॉट साईज एक लॉटची आहे. एका लॉटमध्ये कंपनीचे ६५ शेअर्स आहेत. म्हणजेच किरकोळ गुंतवणुकदारांसाठी आवश्यक असलेली किमान गुंतवणूक १४,३०० रुपये आहे.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)