Lokmat Money >शेअर बाजार > Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स

Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स

Leela Palace IPO: आणखी एक कंपनी आयपीओ मार्केटमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा कोणती आहे ही हॉटेलची चेन?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2024 03:06 PM2024-09-21T15:06:25+5:302024-09-21T15:09:06+5:30

Leela Palace IPO: आणखी एक कंपनी आयपीओ मार्केटमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहा कोणती आहे ही हॉटेलची चेन?

Leela Palace IPO Now the legendary hotel brand will launch IPO See details planning to list soon | Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स

Leela Palace IPO: पैशांची व्यवस्था करून ठेवा! आता दिग्गज हॉटेल ब्रँडचाही येणार IPO; पाहा डिटेल्स

Leela Palace IPO: आणखी एक कंपनी आयपीओ मार्केटमध्ये नशीब आजमावण्यासाठी सज्ज झाली आहे. श्लॉस बंगळुरू असे या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी लीला ब्रँडअंतर्गत पॅलेस, हॉटेल्स आणि रिसॉर्ट चालवते. आता कंपनीनं आयपीओच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपये उभारण्यासाठी सेबीकडे प्राथमिक कागदपत्रं दाखल केली आहेत.

३००० कोटी रुपयांचा फ्रेश इश्यू

रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसच्या मसुद्यानुसार, कंपनीनं नवीन इश्यूद्वारे ३,००० कोटी रुपये आणि ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून २,००० कोटी रुपये उभे करण्याचं उद्दिष्ट ठेवलं आहे. प्रवर्तक प्रोजेक्ट बॅले बंगळुरू होल्डिंग्स (डीआयएफसी) ऑफर-फॉर-सेलमध्ये विक्री शेअरधारक आहे. लक्झरी हॉस्पिटॅलिटी चेन पब्लिक इश्यू लाँच करण्यापूर्वी ६०० कोटी रुपयांच्या प्री-आयपीओ प्लेसमेंटचा विचार करू शकते.

पैशांचं काय करणार?

शेअर बाजारात श्लॉस बंगळुरूच्या लिस्टिंगनंतर ही कंपनी इंडियन हॉटेल्स, ईआयएच, चॅलेट हॉटेल्स आणि जुनिपर हॉटेल्स सारख्या स्पर्धकांशी स्पर्धा करणार आहे. आयपीओच्या रकमेतून कंपनी स्वत:चं आणि उपकंपन्यांचे कर्ज फेडण्यासाठी २,७०० कोटी रुपये देणार आहे. मे २०२४ पर्यंत कंपनीवरील एकत्रित कर्ज ४,०५२.५ कोटी रुपये होतं. उर्वरित आयपीओतील निधी सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरला जाईल, तर ऑफर फॉर सेलमधून मिळणारी रक्कम कंपनीच्या प्रवर्तकाकडे जाईल.

गेल्या काही वर्षांत कंपनीची आर्थिक कामगिरी सुधारली आहे. कंपनीला आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.१ कोटी रुपयांचा तोटा झाला होता. जो आर्थिक वर्ष २०२३ मध्ये ६१.७ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२२ मध्ये ३१९.८ कोटी रुपयांपेक्षा कमी आहे. मात्र आर्थिक वर्ष २०२५ च्या पहिल्या दोन महिन्यांमध्ये तोटा ३६.४ कोटी रुपये होता. 

Web Title: Leela Palace IPO Now the legendary hotel brand will launch IPO See details planning to list soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.