Lokmat Money >शेअर बाजार > LICने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी; भांडवली मूल्य वर्षभरात वाढून ११.८९ लाख कोटींवर

LICने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी; भांडवली मूल्य वर्षभरात वाढून ११.८९ लाख कोटींवर

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 08:36 AM2023-12-28T08:36:53+5:302023-12-28T08:38:07+5:30

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे.

lic earned 2 28 lakh crore from share market capital value rose to 11 89 lakh crore during the year | LICने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी; भांडवली मूल्य वर्षभरात वाढून ११.८९ लाख कोटींवर

LICने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी; भांडवली मूल्य वर्षभरात वाढून ११.८९ लाख कोटींवर

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) यंदा शेअर बाजारात तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘एस इक्विटी’ने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विविध कंपन्यांमधील एलआयसीच्या एकूण शेअर होल्डिंगचे बाजार मूल्य ९.६१ लाख कोटी होते. ते आता वाढून ११.८९ लाख कोटी झाले आहे. सप्टेंबरअखेरीस एलआयसीचे एकूण शेअर होल्डिंग आणि विद्यमान बाजार मूल्य या आधारे ही किंमत काढण्यात आली आहे. 

एलआयसीसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ समभागांत कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. मागील वर्षात एलआयसीच्या लार्सन अँड टुब्रोमधील हिस्सेदारीचे मूल्य ४६ टक्के वाढून ५२,७८६ कोटी झाले. कोल इंडियातील हिस्सेदारीचे मूल्य वाढून २४,०८७ कोटीवर पोहोचले तर एनटीपीसीतील  एलआयसीच्या हिस्सेदारीचे मूल्य ८६ टक्के वाढून २,४०० कोटी रुपये झाले.

गुंतवणूकदारांना जबदरस्त परतावा

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे २६० कंपन्यांचे समभाग आहेत. या समभागांनी एलआयसीला जबरदस्त परतावा दिला आहे.
 

Web Title: lic earned 2 28 lakh crore from share market capital value rose to 11 89 lakh crore during the year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.