Join us

LICने बाजारातून कमावले तब्बल २.२८ लाख कोटी; भांडवली मूल्य वर्षभरात वाढून ११.८९ लाख कोटींवर

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2023 8:36 AM

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : भारतीय आयुर्विमा महामंडळाने (एलआयसी) यंदा शेअर बाजारात तब्बल २.२८ लाख कोटी रुपयांची कमाई केली आहे. ‘एस इक्विटी’ने जारी केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे. 

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये विविध कंपन्यांमधील एलआयसीच्या एकूण शेअर होल्डिंगचे बाजार मूल्य ९.६१ लाख कोटी होते. ते आता वाढून ११.८९ लाख कोटी झाले आहे. सप्टेंबरअखेरीस एलआयसीचे एकूण शेअर होल्डिंग आणि विद्यमान बाजार मूल्य या आधारे ही किंमत काढण्यात आली आहे. 

एलआयसीसाठी सर्वाधिक कमाई करणाऱ्या ५ समभागांत कोल इंडिया, लार्सन अँड टुब्रो, बजाज ऑटो, टाटा मोटर्स आणि एनटीपीसी यांचा समावेश आहे. मागील वर्षात एलआयसीच्या लार्सन अँड टुब्रोमधील हिस्सेदारीचे मूल्य ४६ टक्के वाढून ५२,७८६ कोटी झाले. कोल इंडियातील हिस्सेदारीचे मूल्य वाढून २४,०८७ कोटीवर पोहोचले तर एनटीपीसीतील  एलआयसीच्या हिस्सेदारीचे मूल्य ८६ टक्के वाढून २,४०० कोटी रुपये झाले.

गुंतवणूकदारांना जबदरस्त परतावा

एलआयसी ही देशातील सर्वांत मोठी विमा कंपनी आहेच; पण ती सर्वांत मोठी संस्थात्मक गुंतवणूकदारही आहे. एलआयसीच्या पोर्टफोलिओमध्ये सुमारे २६० कंपन्यांचे समभाग आहेत. या समभागांनी एलआयसीला जबरदस्त परतावा दिला आहे. 

टॅग्स :एलआयसीशेअर बाजारशेअर बाजार