Join us

LIC Share Prices : सर्वाधिक मूल्य असलेल्या टॉप १० कंपन्यांमधून LIC बाहेर, बजाज, अदानी ट्रान्समिशननं घेतली जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2022 2:39 PM

LIC Share Prices : देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा शेअर आपल्या 949 रुपयांच्या इश्यू प्राईजपासून जवळपास 30 टक्क्यांनी घसरला आहे. त्यामुळे त्याचे बाजार मूल्य सुमारे 1.75 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे.

LIC Share Prices : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी  (Life Insurance Corp Of India) बाजार भांडवलाच्या बाबतीत भारतातील पहिल्या 10 कंपन्यांच्या यादीतून बाहेर पडली आहे. त्याची जागा बजाज फायनॅन्स आणि अदानी ट्रान्समिशनने घेतली आहे. या दोन्ही कंपन्यांचे मार्केट कॅप 4.4-4.4 लाख कोटी रुपये आहे. सकाळच्या सत्रात LIC चा शेअर बीएसईवर 0.6 टक्क्यांच्या मजबूतीसह 674 रुपयांवर व्यवहार करत होता आणि त्याचे बाजार मूल्य 4.26 लाख कोटी रुपये होते.

त्याच वेळी, देशातील सर्वात मोठ्या विमा कंपनीचा शेअर त्याच्या 949 रुपयांच्या इश्यू किंमतीपासून जवळपास 30 टक्क्यांनी घसरला आहे. यामुळे कंपनीचे बाजार मूल्य सुमारे 1.75 लाख कोटी रुपयांनी कमी झाले आहे. यानंतर LIC आता 11 व्या स्थानावर पोहोचली आहे. भारतातील टॉप 10 सर्वात मूल्यवान कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, एचडीएफसी बँक, इन्फोसिस, हिंदुस्थान युनिलिव्हर, आयसीआयसीआय बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी, बजाज फायनॅन्स आणि अदानी ट्रान्समिशन यांचा समावेश आहे.

जून तिमाहित 683 कोटींचा नफाअलीकडेच, LIC ने जून 2022 मध्ये संपलेल्या तिमाहीत 683 कोटी रूपयांचा निव्वळ नफा नोंदवला आहे, जो एका वर्षापूर्वी याच कालावधीत 3 कोटी रूपये होता. गेल्या तिमाहीत म्हणजे जानेवारी-मार्च कालावधीत, एलआयसीला 2,371.5 कोटी रुपयांचा नफा झाला. अस्थिरतेमुळे त्याचा नफा कमी झाला असल्याचं अॅनालिसिस्ट कॉलमध्ये एलआयसीनं म्हटलं होतं.

जून तिमाहित एलआयसीच्या नव्या व्यवसायाचे मूल्य तिमाहिनुसार 80 टक्क्यांनी घसरून 1,861 कोटी रुपये झाले, जे मार्च तिमाहीत 9,920 कोटी रुपये होते. एलआयसीने जून तिमाहीत मागील वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 59 टक्के अधिक पॉलिसी विकल्या.

टॅग्स :एलआयसीशेअर बाजार