LIC Q1 Results: देशातील आघाडीची विमा कंपनी लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशनने (LIC) 2023-24 या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. एलआयसीने सांगितले की, या तिमाहीत त्यांचा निव्वळ नफा 9543.71 कोटी रुपये झाला. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 683 कोटी रुपयांचा नफा झाला होता. लिस्टिंगनंतर कंपनीचा हा पहिलाच तिमाही निकाल आहे.
बीएसईवर उपलब्ध आकडेवारीनुसार, वार्षिक आधारावर नफा 683 कोटी रुपयांवरुन 9544 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. न्यू बिझनेस प्रीमियम इन्कम (वैयक्तिक) मध्ये 4.35 टक्के घट झाली होऊन 10462 कोटी रुपये झाली आहे. रिन्यूअल प्रीमियम इनकम 6.61 टक्क्यांच्या वाढीसह 52311 कोटी रुपये आहे. एकूण प्रीमियम (वैयक्तिक) 4.61 टक्क्यांनी वाढून 62,773 कोटी रुपये झाला आहे.
32.16 लाख नवीन पॉलिसी विकल्या गेल्या
LIC चे एकूण प्रीमियम उत्पन्न 98363 कोटी रुपये झाले. एका वर्षापूर्वी ते 98352 कोटी रुपये होते. जून तिमाहीत विमा कंपनीने एकूण 32 लाख 16 हजार 301 नवीन पॉलिसी विकल्या. वार्षिक आधारावर यात 12.64 टक्क्यांनी घट झाली.
एयूएम 46.11 लाख कोटी रुपये
व्यवस्थापनाखालील मालमत्ता, म्हणजेच AUM 12.41 टक्क्यांनी वाढून 46 लाख 11 हजार 66 कोटी रुपये झाली. VNB म्हणजेच नवीन व्यवसाय मार्जिनचे मूल्य 13.7 टक्के आहे, जे एका वर्षापूर्वी 13.6 टक्के होते.
lic शेअर किंमत
LIC चा शेअर सध्या Rs.642 वर आहे. याचा 52 आठवड्यांचा उच्चांक 754 रुपये आणि नीचांक 530 रुपये राहिला आहे. गेल्या 3 महिन्यांत या शेअरमध्ये 15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. LIC चा IPO मे 2022 मध्ये आला होता. इश्यूची किंमत 902-949 रुपये प्रति शेअर होती. हा IPO 21 हजार कोटींचा होता.
LIC वर काय म्हणाले PM मोदी
गुरुवारी संसदेत अविश्वास प्रस्तावावरील चर्चेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पूर्वी एलआयसी बुडणार, गरीबांचा पैसा जाणार, बोलले जात होतो. पण आज LIC सातत्याने मजबूत होत आहे. शेअर मार्केटमध्ये स्वारस्य असलेल्यांसाठी ही टिप आहे. विरोधकांनी नाव ठेवलेल्या सरकारी कंपनी पैसे लावा, नक्की फायदा होईल. PSU बँकांच्या कामगिरीवरही पीएम मोदींनी आनंद व्यक्त केला होता.