Lokmat Money >शेअर बाजार > LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC Q1 Results : कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होतो, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2024 08:06 PM2024-08-08T20:06:36+5:302024-08-08T20:07:02+5:30

LIC Q1 Results : कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होतो, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल.

LIC Q1 Results LIC Announces Quarterly Results; 10 percent increase in net profit, tomorrow is important | LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC ने जाहीर केले तिमाही निकाल; निव्वळ नफ्यात 10 टक्के वाढ, उद्याचा दिवस महत्वाचा...

LIC Q1 Results: आज(8 ऑगस्ट) शेअर बाजार बंद झाल्यानंतर देशातील सर्वात मोठी विमा कंपनी LIC ने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत एलआयसीने सांगितले की, चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा (LIC Q1 net profit) 10 टक्क्यांनी वाढून 10,461 कोटी रुपये झाला आहे. तर गेल्या वर्षी याच कालावधीत (Q1FY24) हा 9,544 कोटी रुपये होता.

कंपनीचे उत्पन्न वाढले
एलआयसीने गुरुवारी एक्सचेंज फाइलिंगमध्ये सांगितल्यानुसार, जून 2024 च्या तिमाहीत कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,10,910 कोटी रुपये झाले आहे, तर वर्षभरापूर्वी ते 1,88,749 कोटी रुपये होते. तसेच, पहिल्या वर्षाच्या प्रीमियम उत्पन्नाच्या (FYPI) बाबतीत, LIC भारताच्या जीवन विमा व्यवसायात अव्वल स्थानावर आहे. 30 जून 2024 रोजी संपलेल्या तिमाहीत, LIC चे एकूण मार्केट शेअर 64.02% आहे, जो मागील वर्षी याच कालावधीत (Q1FY24) 61.42% होते. 

10% अधिक पॉलिसी विकल्या गेल्या
कंपनीने सांगितले की, LIC चे एकूण प्रीमियम उत्पन्न 15.66 टक्क्यांनी वाढून 1,13,770 कोटी रुपये झाले आहे. Q1FY24 मध्ये ते 98,363 कोटी रुपये होते. Q1FY25 मध्ये वैयक्तिक विभागात एकूण 35,65,519 LIC पॉलिसी विकल्या गेल्या आहेत. हे 30 जून 2023 (Q1FY24) रोजी संपलेल्या तिमाहीत विकल्या गेलेल्या 32,16,301 पॉलिसींपेक्षा 10.86% जास्त आहे.

सॉल्व्हन्सी रेशोही वाढला
कंपनीचा जून तिमाहीत पहिल्या वर्षाचा प्रीमियम वाढून रु. 7,470 कोटी झाला आहे, जो मागील वर्षीच्या याच कालावधीत रु. 6,811 कोटी होता. कंपनीने पुनर्विक्री प्रीमियममधूनही रु. 56,429 कोटी कमावले, जे एका वर्षापूर्वी रु. 53,638 कोटी होते. दरम्यान, LIC चा सॉल्व्हेंसी रेशो 30 जून 2024 रोजी 1.99 पर्यंत वाढला, तर 30 जून 2023 रोजी हा 1.89 होता. कंपनीचा सॉल्व्हन्सी रेशो जितका जास्त असेल, तितकी कर्ज वसूल करण्याची क्षमता जास्त असते.

शेअर्समध्ये वाढ 
आज शेअर बाजार बंद झाल्यानंतर एलआयसीने आपले तिमाही निकाल जाहीर केले आहेत. त्यामुळेच आता कंपनीच्या निकालाचा शेअर्सवर कितीही परिणाम होईल, हे उद्या शेअर बाजार उघडल्यावर दिसून येईल. आज LIC च्या शेअरची किंमत 0.04 टक्क्यांच्या वाढीसह 1,124 रुपयांवर बंद झाली आहे.

(टीप- शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

Web Title: LIC Q1 Results LIC Announces Quarterly Results; 10 percent increase in net profit, tomorrow is important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.