मुंबई : गेल्या आठवड्यात शेअर बाजारातील तेजीमुळे गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे. अदानी समूहाच्या शेअर्समध्येही तेजी दिसून आली. समूहातील सर्वच कंपन्यांच्या शेअर्सचे भाव वाढल्यामुळे एलआयसीने केलेली गुंतवणूक पुन्हा नफ्यात आली आहे. हिंडेनबर्गच्या अहवालानंतर अदानी समूहातील सर्व कंपन्यांचे शेअर्स काेसळले.
परंतु, गेल्या ४ ट्रेडिंग सेशन्समध्ये जाेरदार रिकव्हरी दिसून आली. समूहातील सर्व १० लिस्टेड कंपन्यांचे शेअर्स वधारले. अदानी इंटरप्रायजेसचा शेअर ३ मार्च राेजी सर्वाधिक १७ टक्क्यांनी वधारला.
एलआयसी गुंतवणूक ९ हजार काेटींच्या नफ्यात
एलआयसीने अदानी समूहात ३० हजार काेटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. २४ जानेवारीला त्याचे मूल्य ८१,२६८ रुपये एवढे हाेते. मात्र, गेल्या आठवड्यात ते २९ हजार ८९३ काेटी रुपयांवर घसरले हाेते. मात्र, गेल्या आठवड्यातील तेजीमुळे गुंतवणुकीचे मूल्य ३९ हजार काेटी रुपयांपर्यंत वाढले.