Lokmat Money >शेअर बाजार > LIC च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, आज गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक...

LIC च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, आज गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक...

गेल्या एका महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 22, 2023 03:34 PM2023-12-22T15:34:52+5:302023-12-22T15:35:13+5:30

गेल्या एका महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

LIC Share : LIC shares surge, hit 52-week high today | LIC च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, आज गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक...

LIC च्या शेअर्समध्ये तुफान तेजी, आज गाठला 52 आठवड्यांचा उच्चांक...

LIC Share : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी असलेल्या लाइफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन (LIC) च्या शेअर्समध्ये गेल्या काही आठवड्यांपासून झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एलआयसीच्या शेअर्सनी 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. आज हा शेअर रु. 807.00 वर उघडला आणि ट्रेडिंगदरम्यान रु. 821 वर पोहोचला, जो गेल्या एका वर्षातील सर्वोच्च आकडा आहे. सध्या हा शेअर 793.80 वर आहे.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षीच LIC शेअर बाजारात सूचिबद्ध झाली आणि तेव्हापासून सातत्याने गुंतवणूकदारांना तोटा सहन करावा लागतोय. पण आता गेल्या काही आठवड्यांपासून शेअर्स वधारले आहेत. गेल्या एका महिन्यात एलआयसीच्या शेअर्समध्ये सुमारे 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे, तर 6 महिन्यांत सुमारे 24 टक्के वाढ नोंदवली गेली आहे. 

IPO किमतीपासून अजूनही दूर 
17 मे 2022 रोजी LIC च्या शेअर्सची लिस्टिंग झाली होती, तेव्हापासून या शेअरमध्ये सातत्याने घसरण झाली. LIC IPO साठी 902-949 रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला होता. कंपनीचे शेअर्स सुमारे 9 टक्के सवलतीसह बाजारात सूचीबद्ध झाले. LIC च्या IPO चा आकार रु. 20,557 कोटी होता.  अशा परिस्थितीत, ज्या गुंतवणूकदारांना आयपीओमध्ये शेअर्स वाटप केले गेले, ते अजूनही तोट्यात आहेत. मात्र, गेल्या 6 महिन्यांत तोटा थोडा कमी झाला आहे.

Web Title: LIC Share : LIC shares surge, hit 52-week high today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.