Lokmat Money >शेअर बाजार > एलआयसीने साधली संधी, ‘अदानी’ने केले मालामाल

एलआयसीने साधली संधी, ‘अदानी’ने केले मालामाल

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली हाेती.

By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2023 07:11 AM2023-04-12T07:11:48+5:302023-04-12T07:12:08+5:30

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली हाेती.

LIC took the opportunity and Adani made a fortune | एलआयसीने साधली संधी, ‘अदानी’ने केले मालामाल

एलआयसीने साधली संधी, ‘अदानी’ने केले मालामाल

नवी दिल्ली :

जानेवारी महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल जाहीर झाल्यानंतर अदानी समुहाच्या शेअर्समध्ये माेठी घसरण झाली हाेती. त्यावेळी अदानी समूहात एलआयसीने केलेली गुंतवणूक चर्चेत आली हाेती. मात्र, एलआयसीने समूहात गुंतवणूक त्यानंतरही वाढविली आहे. तब्बल ३ लाख ५७ हजार शेअर्स एलआयसीने खरेदी केले आहेत.

‘अदानी’तील कंपन्यांचे शेअर्स फेब्रुवारी महिन्यात काेसळले हाेते. त्यावेळी एलआयसीने केलेली गुंतवणूक ताेट्यात आली हाेती. मात्र, मार्चमध्ये ‘अदानी’चे शेअर्स वधारले. त्यामुळे एलआयसीची गुंतवणूक पुन्हा नफ्यात आली. एलआयसीचा समुहातील वाटा आता ४.२३ टक्क्यांवरून ४.२६ टक्के झाला आहे.

निम्म्या भावात केली शेअर्सची खरेदी
‘अदानी’च्या शेअर्सचे भाव निम्म्याहून अधिक घसरले हाेते. अशावेळी एलआयसीने माेठ्या प्रमाणावर खरेदी केली.  जानेवारीच्या अखेरपर्यंत एलआसीची गुंतवणूक ३० हजार काेटी रुपयांची हाेती. ती वाढली आहे.
याशिवाय इतर छाेटे रिटेल गुंतवणूकदारही या पडझडीत मालामाल झाले आहेत. जानेवारीत २ लाख रुपयांची केलेली गुंतवणूक आता ७.४१ लाखांवर गेली आहे. 

या कंपन्यांमध्ये एलआयसीने वाढविला वाटा
अदानी एन्टरप्राईजेस, अदानी ट्रान्समिशन, अदानी ग्रीन, अदानी टाेटल गॅस. 

Web Title: LIC took the opportunity and Adani made a fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.