Join us

₹३८ चा शेअर पोहोचला ₹६३०० पार, लखपती गुंतवणूकदार झाले कोट्यधीश; कोणता आहे हा शेअर?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 12:10 PM

कंपनीच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर तेजी दिसत आहेत. एकेकाळी या स्टॉकची किंमत फक्त 38.90 रुपये होती.

लिंडे इंडियाच्या शेअर्समध्ये पुन्हा एकदा मोठ्या कालावधीनंतर तेजी दिसत आहेत. आज हा शेअर 5909 रुपयांवर उघडला आणि काही वेळातच 6349.75 रुपयांवर पोहोचला. एकेकाळी या स्टॉकची किंमत फक्त 38.90 रुपये होती. लिस्ट झाल्यापासून या स्टॉकनें गुंतवणूकदारांना 16000% पेक्षा जास्त परतावा दिला आहे. म्हणजेच यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना लक्षाधीशाहून कोट्यधीश केलंय. या कालावधीत 1 लाख रुपयांच्या गुंतवणुकीचं मूल्य आता 1.61 कोटी रुपये झालंय. 

सलग दुसऱ्या ट्रेडिंग सेशनमध्ये लिंडे इंडियाच्या शेअर्समध्ये मोठ्या व्हॉल्युममुळे मंगळवारी सुरुवातीच्या कामकाजादरम्यान 7.4 टक्क्यांची वाढ झाली. यानंतर शेअर चार महिन्यांच्या उच्चांकी 6335 रुपयांवर पोहोचला. मार्च महिन्यात आजपर्यंत या शेअरच्या किंमतीत 17 टक्क्यांची वाढ दिसून आली. 

वर्षभरात 60 टक्क्यांची वाढ 

कंपनीच्या शेअर्सनं गेल्या चार कॅलेंडर वर्षांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे. मार्च 2020 मध्ये आपल्या 401 रुपयांपासून हा शेअर 6300 रुपयांपर्यंत वाढलाय. याशिवाय गेल्या आठ कॅलेंडर वर्षांमध्ये या शेअरनं सकारात्मक कामगिरी केली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या शेअरनं 6885 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला होता. यावर्षी आतापर्यंत यानं 10 टक्क्यांपेक्षा अधिक रिटर्न दिलाय. गेल्या वर्षभरात लिंडे इंडियाच्या शेअर्समध्ये 60 टक्क्यांपेक्षा अधिक वाढ झाली आहे. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकशेअर बाजार