कंडोम बनवणारी कंपनी मॅनकाइंड फार्माची मंगळवारी शेअर बाजारात मोठी लिस्टिंग झाली. लिस्टिंगच्या 45 मिनिटांनंतरच, कंपनीचे शेअर्स दोन्ही एक्सचेंजेसवर 28 टक्क्यांहून अधिक प्रीमियमवर ट्रेडिंग करत होते. तसं, कंपनीचा स्टॉक बीएसई आणि एनएसईवर 20 टक्के प्रीमियमवर उघडला. मॅनकाइंड फार्माची कामगिरी त्या कंपन्यांना बूस्टर देऊ शकते ज्यांनी त्यांचे IPO दीर्घकाळ पुढे ढकलले होते. मॅनकाइंड फार्माची कामगिरी आता आयपीओला गती देऊ शकते असं म्हटलं जातंय.
मॅनकाइंड फार्मा सकाळी 9.44 वाजता शेअर बाजारात लिस्ट झाली. कंपनीच्या शेअरची इश्यू प्राईज 1080 रुपये होती, जेव्हा लिस्टिंग बेल वाजली तेव्हा कंपनीचा स्टॉक 20 टक्के प्रीमियमसह 1300 रुपयांवर उघडला. एका तासाच्या आत, कंपनीचा शेअर बीएसईवर 30 टक्क्यांहून अधिक प्रीमियमसह 1,399.95 रुपयांवर पोहोचला होता. तर दुसरीकडे राष्ट्रीय शेअर बाजारात कंपनीच्या समभागाने 30 टक्के प्रीमियमसह 1,399 रुपयांचा उच्चांक गाठला होता.
किती झाला फायदा?
IPO मध्ये एका लॉटमध्ये 13 शेअर्स होते. ज्याची किंमत 14,040 रुपये होती. जर एखाद्या गुंतवणूकदाराने 7 लॉटमध्ये गुंतवणूक केली असेल, तर त्याचे एकूण गुंतवणुकीचे मूल्य 98,280 रुपये झालं असतं. ट्रेडिंग सत्रादरम्यान कंपनीचा शेअर 1,399.95 रुपयांच्या उच्चांकावर पोहोचला होता. याचा अर्थ 91 शेअर्सचे गुंतवणूक मूल्य 1,27,395.45 रुपये झाले. याचा अर्थ एका तासात गुंतवणूकदाराला 29,115.45 रुपये नफा झाला. शेअर बाजाराच्या कामाकाजाच्या अखेरिस हा शेअर 1422.30 रूपयांवर पोहोचला. यानुसार पहिल्याच दिवशी कंपनीनं आपल्या गुंतवणूकदारांना 91 शेअर्समागे 31149 रुपयांचा नफा मिळवून दिला.