Join us  

IPO चं धमाकेदार लिस्टिंग, पैसा झाला डबल; गुंतवणूकदारांना २५१% पर्यंत फायदा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2024 10:59 AM

कंपनीनं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत.

Esconet Technologies IPO नं शेअर बाजारात धमाकेदार एन्ट्री केली आहे. लिस्टिंगच्या दिवशीच कंपनीनं गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट केले आहेत. ही SME कंपनी 245 टक्के प्रीमियमसह 290 रुपयांना लिस्ट झाली. कंपनीचा इंट्रा-डे उच्चांकी स्तर 294.95 रुपये आहे. म्हणजेच पात्र गुंतवणूकदारांना 251 टक्के नफा मिळालाय. 

या जबरदस्त लिस्टिंगनंतर कंपनीच्या शेअरची किंमत 5 टक्क्यांनी घसरली. त्यानंतर कंपनीच्या शेअर्सची किंमत 275.50 रुपयांच्या पातळीवर आली. दरम्यान, कंपनीच्या शेअर्सचा प्राईज बँड 80 रुपये ते 84 रुपये प्रति शेअर होता. 

एका लॉटमध्ये किती शेअर्स?  

कंपनीनं किरकोळ गुंतवणूकदारांसाठी एका लॉटमध्ये 1600 शेअर्स ठेवले होते. त्यामुळे गुंतवणूकदाराला किमान 1,34,400 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. हा IPO 16 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी दरम्यान खुला होता. 21 फेब्रुवारी 2024 रोजी शेअर्सचं वाटप करण्यात आलं. दरम्यान, IPO ची साईज 28.22 कोटी रुपये होती. कंपनीने 33.6 लाख फ्रेश शेअर्स जारी केले होते. 

Esconet Technologies IPO अखेरच्या दिवशी 507 पट सबस्क्राईब झाला होता. अखेरच्या दिवशी रिटेल श्रेणीत 553.02 पट सबस्क्रिप्शन मिळाले. 3 दिवसांच्या सबस्क्रिप्शन कालावधीत कंपनीचा आयपीओ 600 पेक्षा अधिक पट सबस्क्राईब झाला होता. 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारइनिशिअल पब्लिक ऑफरिंगशेअर बाजार