NSE SME IPO: पॉवर सोल्युशन्स कंपनी सनगार्नर एनर्जीजच्या आयपीओनं शेअर बाजारात जोरदार एन्ट्री केली. या IPO ची इश्यू प्राईज ₹ 83 होती, तर दुसरीकडे कंपनीच्या शेअरचं लिस्टिंग ₹ 237.50 झालं. त्याच वेळी, ट्रेडिंग दरम्यान शेअरची किंमत 262 रुपयांपर्यंत पोहोचली होती. मात्र, या काळात प्रॉफिट बुकींगही दिसून आलं आणि शेअरला 5 टक्क्यांचं लोअर सर्किट लागलं.
आयपीओची किमान लॉट साइज 1600 शेअर्सची होती. त्याच वेळी, आयपीओमध्ये 640,000 इक्विटी शेअर्सचा फ्रेश इश्यूचा समावेश आहे, ज्याची किंमत एकूण ₹ 5.31 कोटी आहे. यामध्ये विक्रीसाठी कोणतंही ऑफर फॉर सेल नव्हतं.
कंपनीच्या रेड हेरिंग प्रॉस्पेक्टसनुसार (RHP) आयपीओमधून उभारलेला निधी भांडवली आवश्यकता, सामान्य कॉर्पोरेट उद्देश आणि इश्यू-संबंधित खर्च पूर्ण करण्यासाठी वापरला जाईल. हा आयपीओ 21 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट दरम्यान खुला होता. आयपीओचे मुख्य व्यवस्थापक फास्ट ट्रॅक फिनसेक प्रायव्हेट लिमिटेड आहेत आणि रजिस्ट्रार स्कायलाइन फायनान्शियल सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड आहेत.
कंपनीबाबत माहिती
सुंगार्नर एनर्जी ग्राहकांना वीज क्षेत्रात डिझाईन आणि इंजिनिअरिंग सेवांसोबत सौर ऊर्जा, युपीएस, बॅटरी, इन्व्हर्टर आणि सौर पॅनल सारखे पॉवर सोल्युशन्स पुरवते. कंपनी निरनिराळ्या प्रकारच्या सेवा पुरवते. यामध्ये सोलर एनर्जी प्रोडक्शन सिस्टम आणि याच्या प्लांटशी निगडीत प्रोजेक्टचे ऑपरेशन आणि मेंटेनन्स यांचा समावेश आहे.
(टीप - यामध्ये शेअरच्या कामगिरीची माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांना सल्ला घेणं आवश्यक आहे.)