Join us

'या' शेअरनं बनवलं करोडपती; ४ वर्षांत १००००% पेक्षा अधिक रिटर्न, एकेकाळी ₹१५ पेक्षाही कमी होती किंमत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:33 IST

Crorepati Stock: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत जे या घसरणीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. या शेअरनंही गुंतवणूकदारांना मालामाल केलंय.

Crorepati Stock: गेल्या अनेक दिवसांपासून शेअर बाजारात सातत्यानं घसरण होत आहे. त्याचबरोबर असे अनेक शेअर्स आहेत जे या घसरणीतही गुंतवणूकदारांना चांगला परतावा देत आहेत. जर तुम्ही दीर्घकाळ गुंतवणूक सुरू ठेवली तर तुम्हाला जास्त नफा होऊ शकतो असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. अशाच एका मल्टिबॅगर शेअरनं अवघ्या चार वर्षांत गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनवलंय आहे. लॉयड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (Lloyds Metals & Energy Ltd)असं या शेअरचं नाव आहे.

कशी होती स्थिती?

या आठवड्यातही शेअर बाजारात घसरण पाहायला मिळत आहे. तर लॉईड्स मेटल्स अँड एनर्जीचे शेअर्स ग्रीन झोनमध्ये आहेत. या आठवड्यात सेन्सेक्स ०.१३ टक्क्यांनी घसरलाय, तर शेअरमध्ये जवळपास ६ टक्क्यांची तेजी दिसली आहे. मात्र, शुक्रवारी त्यात काहीशी घसरण झाली. शुक्रवारी हा शेअर ०.१३ टक्क्यांनी घसरून ११९३.९० रुपयांवर बंद झाला.

वर्षभरात दुप्पट परतावा

या शेअरने वर्षभरात गुंतवणूकदारांना दुप्पट परतावा दिलाय. वर्षभरापूर्वी याची किंमत ५७०.७० रुपये होती. आता तो ११९३.९० रुपयांवर आलाय. अशा तऱ्हेनं वर्षभरात प्रति शेअर ६२३.२० रुपये नफा दिला आहे. तो दुपटीहून अधिक आहे. वर्षभरापूर्वी जर तुम्ही यात १ लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज त्याची किंमत २ लाख रुपयांपेक्षा जास्त झाली असती.

३ वर्षांत १० पट कमाई

दीर्घ काळासाठी हा शेअर गुंतवणूकदारांना जबरदस्त फायदा देत आहे. तीन वर्षांच्या परताव्याबद्दल बोलायचं झालं तर या काळातही गुंतवणूकदारांना मोठी कमाई करून दिली आहे. या शेअरनं तीन वर्षांत सुमारे ८८१ टक्के परतावा दिलाय. म्हणजे गुंतवणूकदारांना जवळपास १० पट पैसे कमावले आहेत असं म्हणता येईल. या तीन वर्षांत गुंतवणूक एक लाख रुपयांवरून सुमारे दहा लाख रुपयांपर्यंत वाढली आहे.

४ वर्षात केलं कोट्यधीश

या शेअरने गुंतवणूकदारांना ४ वर्षात कोट्यधीश बनवले आहे. या काळात कंपनीनं गुंतवणूकदारांना १००००% पेक्षा जास्त परतावा दिलाय. चार वर्षांपूर्वी याची किंमत १५ रुपये कमी म्हणजे ११.४८ रुपये होती. आता तो ११९३.९० रुपये झाला आहे. यानं चार वर्षांत १०,३०० टक्के परतावा दिला आहे. जर तुम्ही चार वर्षांपूर्वी एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज मूल्य एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झालं असतं.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूकर करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक