Lokmat Money >शेअर बाजार > Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक

Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक

Lok Sabha 2024 Modi 2.0 Shares : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:01 AM2024-06-04T09:01:45+5:302024-06-04T09:02:51+5:30

Lok Sabha 2024 Modi 2.0 Shares : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली. दरम्यान, असेही काही शेअर्स आहेत, ज्यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गुंतवणूकदारांना कोट्यधीश केलं आहे.

Lok Sabha Election 2024 In Modi 2 0 some stocks reached the maximum of 13 shares, investors of 1 lakh investment become 8 crores sensex up | Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक

Lok Sabha Election 2024 : मोदी २.० मध्ये 'या' १३ शेअर्सनं केली कमाल, १ लाखांची गुंतवणूक करणारे झाले ८ कोटीेचे मालक

Lok Sabha 2024 Modi 2.0 Shares : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्यापूर्वीच शेअर बाजारात वादळी तेजी पाहायला मिळाली. बाजार तज्ज्ञांच्या मते, एक्झिट पोलच्या अंदाजानंतर ही तेजी होती आणि हा अंदाज प्रत्यक्षात उतरला तर मंगळवारी निवडणूक निकालाच्या दिवशी बाजार पुन्हा नव्या उंचीला स्पर्श करताना दिसेल. दरम्यान, मोदी ३.० मधील १३ खास शेअर्सवर गुंतवणूकदारांची नजर असणार आहे. खरं तर मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळात गुंतवणूकदारांना कोट्यधीश बनविण्याचं कामही या शेअर्सनी केलं आहे. सोमवारी शेअर बाजारात मोठ्या प्रमाणात तेजी दिसून आली होती. 
 

मोदी सरकारमध्ये हे शेअर्स बनले मल्टीबॅगर
 

आता मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्ममध्ये गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर रिटर्न देत कोट्यधीश केलेल्या शेअर्सबद्दल बोलूया. या यादीत १३ शेअर्स असे आहेत ज्यात एक लाख रुपयांची गुंतवणूक करणारे कोट्यधीश झाले. काही शेअर्समध्ये १०,००० टक्के वाढ झाली, तर काहींनी ८६००० टक्क्यांपर्यंत परतावा दिला. 
 

मोदी २.० दरम्यान डायमंड पॉवर इन्फ्रास्ट्रक्चरचा शेअर ८४,६०४% वाढीसह कोट्यधीश शेअर्सच्या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. ३० मे २०१९ रोजी कंपनीच्या शेअरची किंमत १.०३ रुपये होती, जी ३१ मे २०२४ रोजी ८७२.४५ रुपयांवर पोहोचली. म्हणजेच ज्यांनी १ लाख रुपयांची गुंतवणूक केली त्यांची रक्कम पाच वर्षांत ८.४७ कोटी रुपये झाली. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर वारी रिन्यूएबल टेक शेअरचा वाटा होता. गेल्या पाच वर्षांत या शेअरनं ६९,४६४ टक्के परतावा दिला आणि तो २,३९३ रुपयांवर गेला. त्यानुसार ५ वर्षात १ लाखांची गुंतवणूक करणाऱ्यांच्या रकमेचं मूल्य ६.९७ कोटी रुपये झाली.
 

कोट्यधीश बनवणाऱ्यांच्या यादीत कोणते शेअर्स?
 

डायमंड पॉवर आणि वारी रिन्यूएबल या कंपन्यांच्या शेअर्सव्यतिरिक्त हजूर मल्टी प्रोजेक्ट्स शेअर, ऑर्किड फार्मा, प्रव्हेज शेअर, पतंजली फूड्स शेअर, डॉल्फिन ऑफशोर एंटरप्रायजेस (इंडिया) या शेअर्सचा या यादीत समावेश आहे. डब्ल्यूएस इंडस्ट्रीज (इंडिया), एसजी फिनसर्व्ह, रीमीडियम लाइफकेअर, रजनीश रिटेल, लॉयड्स इंजिनीअरिंग वर्क्स शेअर आणि जे तापरिया प्रोजेक्ट्स यांनीही या कालावधीत १०,००० टक्के ते २९,००० टक्के परतावा दिला आहे.
 

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीबद्दल माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Lok Sabha Election 2024 In Modi 2 0 some stocks reached the maximum of 13 shares, investors of 1 lakh investment become 8 crores sensex up

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.