Join us  

एचडीएफसी बँकेचे मोठं नुकसान! चार दिवसात १ लाख कोटी रुपयांचे नुकसान; नेमकं कारण काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 11:08 PM

HCDFC बँकेचे शेअर्स १५५७ रुपयांवर उघडले होते आणि २.११ टक्क्यांच्या घसरणीसह १५२४ रुपयांच्या दिवसाच्या नीचांकी पातळीवर आले.

देशातील सर्वात मोठ्या खासगी बँकेच्या शेअर्समध्ये चार दिवसांत ६ टक्क्यांहून अधिक घसरण झाली आहे. या काळात बँकेच्या मार्केट कॅपमध्ये सुमारे एक लाख कोटी रुपयांची घट झाली आहे. बीएसईच्या आकडेवारीनुसार, सध्या एचडीएफसी बँकेचे एमकॅप ११.५९ लाख कोटी रुपये आहे.

जबरदस्त परतावा! 'या' बँकांनी ग्राहकांना FD वर वाढीव व्याजदराची भेट दिली

HDFC बँकेचे शेअर्स शुक्रवारी १५५७ रुपयांवर उघडले आणि २.११ टक्क्यांच्या घसरणीसह १५२४ रुपयांच्या नीचांकी पातळीवर आले. शेअर बाजार बंद झाला तेव्हा बँकेचे शेअर्स १.५७ टक्क्यांच्या घसरणीसह १,५६२९.२९ रुपयांवर बंद झाले. देशांतर्गत इक्विटी बेंचमार्क शुक्रवारी सलग चौथ्या दिवशी घसरत राहिले, निफ्टी ५० ६८ अंकांनी किंवा ०.३४ टक्क्यांनी घसरून १९,६७४.२५ वर, तर सेन्सेक्स २२१ अंकांनी किंवा ०.३३ टक्क्यांनी घसरून ६६,००९.१५ वर बंद झाला.

तज्ज्ञांच्या मते, परदेशी निधीचा प्रवाह आणि एचडीएफसी बँकेच्या समभागांची प्रचंड विक्री यामुळेही गुंतवणूकदारांवर परिणाम झाला. निफ्टी ५० मध्ये २.६ टक्क्यांनी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये २.७ टक्क्यांची घसरण झाली आहे. २२ सप्टेंबर रोजी संपलेल्या आठवड्यात, बीएसई मिडकॅप निर्देशांक १.७ टक्क्यांनी घसरला आणि स्मॉलकॅप निर्देशांक २ टक्क्यांनी घसरला.

 (टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची  गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :एचडीएफसीशेअर बाजार