Lokmat Money >शेअर बाजार > ₹2 च्या शेअरची कमाल, दिला 36,687% परतावा! खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; अंबानींचाही मोठा डाव!

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 36,687% परतावा! खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; अंबानींचाही मोठा डाव!

मार्च 2001 पासून आतापर्यंत हा शेअर 2 रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 36,687% एवढा परतावा दिला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2024 05:43 PM2024-07-18T17:43:06+5:302024-07-18T17:43:35+5:30

मार्च 2001 पासून आतापर्यंत हा शेअर 2 रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 36,687% एवढा परतावा दिला आहे.

lotus chocolate company rs 2 share, gave 36,687% return Investors flock to buy; Ambani's big move | ₹2 च्या शेअरची कमाल, दिला 36,687% परतावा! खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; अंबानींचाही मोठा डाव!

₹2 च्या शेअरची कमाल, दिला 36,687% परतावा! खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; अंबानींचाही मोठा डाव!

शेअर बाजारातील मायक्रोकॅप कंपनी लोटस चॉकलेटच्या शेअरमध्ये गुरुवारी 5% चे अप्पर सर्किट लागले आहे. याच बरोबर कंपनीचा शेअर 735.75 रुपयांच्या इंट्रा डे हायवर पोहोचला आहे. जुन तिमाहीच्या निकालामुळे या शेअरमध्ये ही तेजी आली आहे. खरे तर, जून तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा वार्षिक आधारावर 4700.87% ने वाढला आहे.

जून तिमाहीचे परिणाम -
गेल्या तिमाहीच्या तुलनेत कंपनीच्या महसुलात 114.7% ची वाढ झाली आहे. कंपनीच्या विक्री तसेच सामान्य आणि प्रशासकीय खर्चात तिमाही-दर-तिमाही 37.33% ची वाढ झाली असून 163.96% एवढी वार्षिक वाढ झाली आहे. तसेच, परिचालन उत्पन्न तिमाही-दर-तिमाही 630.43% आणि वर्षिक आधारावर 89004.88% ने वाढले आहे.

मुकेश अंबानींचीही हिस्सेदारी -
2023 मध्ये, रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) ची FMCG ब्रांच, रिलायन्स कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेडने (RCPL) Lotus Chocolate Company Limited मधील एकूण 74 कोटी रुपयांच्या 51 टक्के कंट्रोलिंग स्टेकचे संपादन पूर्ण केले होत. अधिग्रहणानंतर हा स्टॉक 400 टक्क्यांहून अधिक वाढला आहे.

अशी आहे शेअरची स्थिती - 
या शेअरने केवळ सहा महिन्यांत आपल्या गुंतवणूकदारांना 108 टक्के एवढा मल्टीबॅगर परतावा दिला आहे. लोटस चॉकलेट कंपनीने गेल्या 1 आठवड्यात 3.49% आणि यावर्षी YTD मध्ये आतापर्यंत 143% परतावा दिला आहे. गेल्या पाच वर्षांचा विचार करता, या शेअरने 4000% पेक्षाही अधिक परतावा दिला आहे. 

मार्च 2001 पासून आतापर्यंत हा शेअर 2 रुपयांवरून आताच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. अर्थात या कालावधीत या शेअरने तब्बल 36,687% एवढा परतावा दिला आहे. सध्या लोटस चॉकलेट कंपनीचे मार्केट कॅप 944.78 कोटी रुपये एवढे आहे.

Web Title: lotus chocolate company rs 2 share, gave 36,687% return Investors flock to buy; Ambani's big move

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.