Join us  

Macobs Tech IPO Listing: ट्रिमर बनवणाऱ्या कंपनीचं जबरदस्त लिस्टिंग, २८% प्रीमिअम एन्ट्रीनंतर शेअरला अपर सर्किट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2024 10:52 AM

Macobs Tech IPO Listing: ट्रिमर कंपनीच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. कंपनीच्या आयपीओला एकूण २०२ पट सबस्क्रिप्शन मिळालं होतं. लिस्टिंगनंतर गुंतवणूकदारांना जबरदस्त नफा झाला.

Macobs Tech IPO Listing: ट्रिमर कंपनी मॅकोब्स टेकच्या शेअर्सनं आज एनएसईच्या एसएमई प्लॅटफॉर्मवर जोरदार एन्ट्री घेतली. कंपनीच्या आयपीओला एकूण २०२ पट सबस्क्रिप्शन मिळालं. आयपीओ अंतर्गत ७५ रुपयांच्या भावानं शेअर्स जारी करण्यात आले होते. आज एनएसई एसएमईवर तो ९६ रुपयांवर पोहोचला, म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदारांना २८ टक्के लिस्टिंग नफा (Macobs Tech Listing Gain) मिळाला. लिस्टिंगनंतर शेअरमध्ये आणखी वाढ झाली आणि शेअर १००.८० रुपयांच्या अपर सर्किटवर (Macobs Tech Share Price) पोहोचला. म्हणजेच आयपीओ गुंतवणूकदार आता ३४.४ टक्के नफ्यात आहेत.

कंपनीच्या आयपीओला उत्तम प्रतिसाद

मॅककॅब्स टेकचा १९.४६ कोटी रुपयांचा आयपीओ १६ ते १९ जुलै दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला झाला. आयपीओला गुंतवणूकदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि एकूण २०२.३२ पट सब्सक्राइब झाला. यामध्ये क्वालिफाईड इन्स्टिट्युशनल बायर्स (QIB) राखीव हिस्सा ८८.९२ पट, नॉन इन्स्टिट्युशनल इनव्हेस्टर्सचा हिस्सा (NII) २६६.७० पट आणि किरकोळ गुंतवणूकदारांसाठीचा हिस्सा १७६.८७ पट सबस्क्राईब झाला होता. 

या आयपीओअंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे २५,९५,२०० नवे शेअर्स जारी करण्यात आले. या पैशांचा वापर मार्केटिंग, कर्जाची परतफेड, वर्किंग कॅपिटलच्या गरजा भागविणं, सामान्य कॉर्पोरेट हेतू आणि इश्यूशी निगडित खर्चासाठी केला जाईल.

कंपनीबद्दल माहिती

२०१९ मध्ये सुरू झालेल्या मॅकबीज टेक ट्रिमर, हायजिन प्रोडक्ट, ब्रीफ अँड सेल्फ-केअर आयटम ऑनलाइन विकते. कंपनीच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलायचं झालं तर ती सातत्यानं मजबूत झाली आहे. आर्थिक वर्ष २०२२ मध्ये कंपनीचा निव्वळ नफा ३८.८९ लाख रुपये होता, जो पुढील आर्थिक वर्ष २०२३ मध्ये २.०५ कोटी रुपये आणि आर्थिक वर्ष २०२४ मध्ये २.२१ कोटी रुपये झाला. या कालावधीत कंपनीचा महसूल वार्षिक ८५ टक्क्यांहून अधिक चक्रवाढ वाढीच्या दराने (CAGR) वाढून २०.७५ कोटी रुपयांवर पोहोचला.

(टीप : यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूक