Lokmat Money >शेअर बाजार > Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल

Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल

सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं आज उच्चांकी पातळी गाठली.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 03:46 PM2024-07-01T15:46:05+5:302024-07-01T15:46:20+5:30

सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं आज उच्चांकी पातळी गाठली.

Mahanagar Gas shares surge stock hits record high Investor huge profit know what brokerage said | Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल

Mahanagar Gasच्या शेअरमध्ये तुफान तेजी, विक्रमी स्तरावर पोहोचला स्टॉक; गुंतवणूकदार मालामाल

Mahanagar Gas News: सीएनजी-पीएनजी पुरवठा करणाऱ्या महानगर गॅस लिमिटेड या कंपनीच्या शेअर्सनं आज उच्चांकी पातळी गाठली. सोमवार, १ जुलै रोजी एनएसईवर हा शेअर १६०४.९० रुपयांवर उघडला आणि त्यानंतर तो १७४७.३५ रुपयांवर पोहोचला. हा या शेअरचा आजवरचा उच्चांक आहे. हा शेअर ९७०.५५ रुपयांच्या ५२ आठवड्यांच्या नीचांकी पातळीपेक्षा जवळपास दुप्पट आहे. कामकाजाच्या अखेरिस हा शेअर ९.८४ टक्क्यांच्या वाढीसह १७५४ रुपयांवर बंद झाला.

गेल्या ५ दिवसांत महानगर गॅसच्या शेअरनं १५ टक्के परतावा दिला आहे. गेल्या महिन्याभरातील परताव्याबाबत बोलायचं झालं तर त्यात सुमारे २५ टक्क्यांची वाढ नोंदविण्यात आली आहे. मात्र, सहा महिन्यांत शेअरनं ४३ टक्के परतावा दिलाय. गेल्या वर्षभरात ६० टक्के परतावा देऊन गुंतवणूकदारांना खूश केले आहे. जुलैमधील रिटर्न ट्रेंडबद्दल बोलायचे झालं तर गेल्या ७ पैकी ४ वर्षात शेअरनं सकारात्मक परतावा दिला आहे.

काय म्हटलंय ब्रोकरेजनं?

२९ पैकी १८ ब्रोकरेज हाऊसनं महानगर गॅस खरेदी करण्याची शिफारस केली आहे. यापैकी १२ जणांनी स्ट्राँग बायची तर ६ जणांनी बायची शिफारस केली आहे. तर, सहा जणांनी होल्ड तर २ जणांनी विक्रीची शिफारस केली. याशिवाय तीन जणांनी तो विकण्याचा सल्ला दिलाय.
महानगर गॅस लिमिटेडनं २३ जानेवारी २०२४ रोजी प्रति शेअर १२ रुपये इक्विटी अंतरिम लाभांश जाहीर केला होता. त्यामुळे कंपनीनं १० रुपये प्रति शेअर फेस व्हॅल्यूवर १२० टक्के लाभांश दिला.

(टीप - यामध्ये केवळ शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. यातील तज्ज्ञांची मतं त्यांची वैयक्तिक मतं आहेत. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: Mahanagar Gas shares surge stock hits record high Investor huge profit know what brokerage said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.