PN Gadgil Jewellers IPO: राज्यातील प्रसिद्ध पु.ना. गाडगीळ ज्वेलर्स आयपीओ लाँच करण्याच्या तयारीत आहेत. या आयपीओसाठी प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. हा आयपीओ ११०० कोटी रुपयांचा असणार असून यासाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइज बँड निश्चित करण्यात आलाय.
पुढील आठवड्यात १० सप्टेंबर रोजी हा इश्यू सबस्क्रिप्शनसाठी खुला होईल. मात्र, तो ९ सप्टेंबरपासून अँकर गुंतवणूकदारांसाठी खुला होणार आहे. ग्रे मार्केटबद्दल बोलायचं झालं तर या शेअर्सबाबत सध्या फारशी हालचाल नाही. मात्र, ग्रे मार्केटमधून संकेत देण्याऐवजी गुंतवणुकीचे निर्णय कंपनीच्या फंडामेंटल आणि फायनान्शिअल्सच्या आधारे घ्यावे, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
आयपीओबद्दल अधिक माहिती
पु.ना. गाडगीळ ज्वेलर्सचा ११०० कोटी रुपयांचा आयपीओ १० ते १२ सप्टेंबर दरम्यान सब्सक्रिप्शनसाठी खुला होईल. या आयपीओसाठी ४५६ ते ४८० रुपयांचा प्राइस बँड निश्चित करण्यात आला आहे. आयपीओच्या एका लॉटमध्ये ३१ शेअर्स असतील. आयपीओ अंतर्गत शेअर्सचं वाटप १३ सप्टेंबर रोजी अंतिम केलं जाईल. त्यानंतर १७ सप्टेंबरला बीएसई आणि एनएसईवर शेअर्स लिस्ट होतील.
इश्यूचे रजिस्ट्रार बिगशेअर सर्व्हिसेस आहेत. या आयपीओअंतर्गत ८५० कोटी रुपयांचे नवे शेअर्स जारी केले जातील. याशिवाय ऑफर फॉर सेल विंडो अंतर्गत १० रुपयांच्या फेस व्हॅल्यूचे ५२,०८,३३३ शेअर्स विकले जातील. एसव्हीजी बिझनेस ट्रस्ट ऑफर फॉर सेल अंतर्गत शेअर्सची विक्री करेल. ऑफर फॉर सेलची रक्कम शेअर्स विकणाऱ्या भागधारकांना दिले जातील. नव्या शेअर्सच्या माध्यमातून जमा झालेल्या रक्कम पैकी ३८७ कोटी रुपये महाराष्ट्रात १२ नवीन स्टोअर्स उघडण्यासाठी आणि ३०० कोटी रुपये कर्ज फेडण्यासाठी वापरले जातील. उर्वरित रक्कम सामान्य कॉर्पोरेट कारणांसाठी वापरली जाईल. २९ फेब्रुवारीपर्यंत कंपनीवरील कर्ज ३७७.४५ कोटी रुपये होते.
स्टोअर्सच्या संख्येनुसार पु.ना.गाडगीळ हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे ऑर्गनाईज्ड ज्वेलर्स आहेत. डिसेंबर २०२३ च्या आकडेवारीनुसार त्यांचे महाराष्ट्र आणि गोव्या ३३ स्टोअर्स आहेत. तसंच अमेरिकेतही एक स्टोअर आहे. यापैकी २३ कंपनीकडून तर १० फ्रेन्चायझी स्टोअर्स आहेत. आर्थिक वर्ष २०२३ मध्ये त्यांचं नेट प्रॉफिट ३४.८ टक्क्यांच्या वाढीसह २३.७ कोटी रुपयांवर पोहोचलं होता. तर महसूल ४,५०७.५ कोटी रुपयांवर पोहोचला होता.
(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. शेअर बाजारातीलगुंतवणूक जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)