Lokmat Money >शेअर बाजार > ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश

ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश

maharashtra scooters : ऑटो कंपोनंट निर्माता महाराष्ट्र स्कूटर्सने बुधवारी त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा ५१,५३०% पेक्षा जास्त वाढला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 15:48 IST2025-04-23T15:27:44+5:302025-04-23T15:48:11+5:30

maharashtra scooters : ऑटो कंपोनंट निर्माता महाराष्ट्र स्कूटर्सने बुधवारी त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. गेल्या वर्षीच्या याच तिमाहीच्या तुलनेत कंपनीचा नफा ५१,५३०% पेक्षा जास्त वाढला आहे.

maharashtra scooters share price increase after quarter 4 results dividend | ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश

ऑटो कंपोनट निर्माता कंपनीची वर्षात ५१,५३० टक्के वाढ; प्रत्येक शेअरवर मिळणार ६० रुपयांचा लाभांश

maharashtra scooters : ट्रम्प टॅरिफदरम्यान भारतीय कंपन्यांचे तिमाही निकाल समोर येत आहेत. शेअर बाजारातही निकालाचे पडसाद पाहायला मिळत आहे. महाराष्ट्र स्कूटर्सने बुधवारी त्यांचे चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले. कंपनीने म्हटले आहे की मार्च तिमाहीत त्यांचा नफा लक्षणीयरीत्या वाढला आहे. या कालावधीत कंपनीचा नफा ५१.६३ कोटी रुपये होता, तर गेल्या वर्षी याच तिमाहीत तो फक्त १० लाख रुपये होता. अशाप्रकारे, कंपनीचा नफा गेल्या वर्षीच्या तुलनेत ५१,५३०% पेक्षा जास्त वाढला आहे. चांगली कमाई आणि मजबूत आर्थिक कामगिरीमुळे कंपनीचा नफा वाढला आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. कंपनीने मार्च २०२५ मध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षासाठी प्रति शेअर ३० रुपयांचा अंतिम आणि विशेष लाभांश देखील जाहीर केला आहे.

गुंतवणूकदार कोट्यधीश
चौथ्या तिमाहीत कंपनीचा महसूल ६६५ लाख रुपये होता, जो गेल्या वर्षी याच तिमाहीत ५१८ लाख रुपये होता. अशाप्रकारे कंपनीच्या उत्पन्नात २८.४% वाढ झाली आहे. दरम्यान, महाराष्ट्र स्कूटर्सच्या शेअर्सच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. बीएसई तो ६% पेक्षा जास्त वाढून १२५९१.०० रुपयांवर पोहचला आहे. गेल्या एका वर्षात या शेअरमध्ये ४६% वाढ झाली आहे. गेल्या ३ महिन्यांत तो २२%, गेल्या एका महिन्यात १४.५% आणि एका आठवड्यात जवळजवळ ८% वाढला आहे.

गुंतवणूकदारांनी काय करावे?
तज्ञांच्या मते, हा स्टॉक सध्या त्याच्या सर्व महत्त्वाच्या मूव्हिंग अॅव्हरेजपेक्षा जास्त व्यवहार करत आहे. यामध्ये ५० दिवस, १०० दिवस, १५० दिवस आणि २०० दिवसांच्या मूव्हिंग सरासरीचा समावेश आहे. त्याचा १४ दिवसांचा रिलेटीव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) ६६.२ आहे. आरएसआयवरुन दिसतंय की स्टॉक वरच्या ट्रेंडमध्ये आहे. परंतु, तो अजूनही ओव्हरबॉट झोनच्या खाली आहे. याचा अर्थ असा की स्टॉक अजूनही खरेदी करण्यासारखा आहे. ही कंपनी ऑटोमोबाईल क्षेत्रासाठी डाय, जिग्स, फिक्स्चर आणि डाय कास्टिंग घटकांचे उत्पादन करते.

वाचा - यंदा इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची अंतिम तारीख काय आहे? अनेकजण करतात 'ही' चूक

(टीप - यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. म्युच्युअल फंडातील गुंतवणूक ही शेअर बाजारातील जोखमीच्या अधीन असते. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Web Title: maharashtra scooters share price increase after quarter 4 results dividend

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.