Join us

बाजार बंद झाल्यानंतर 'या' 2 'महारत्न' कंपन्यांमध्ये झाली मोठी डील, गुरुवारी स्टॉकवर ठेवा लक्ष ...

By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2024 10:14 PM

Maharatna PSU Stock: या दोन्ही कंपन्यांसाठी गुरुवारचा दिवस महत्वाचा असणार आहे.

Maharatna PSU Stock: आज(28 फेब्रुवारी 2024) शेअर बाजार बंद झाल्यानंतर कोल इंडिया लिमिटेड (CIL) आणि भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) या सार्वजनिक क्षेत्रातील 'महारत्न' कंपन्यांमध्ये एक मोठा करार झाला. याद्वारे कोळसा गॅसिफिकेशन तंत्रज्ञान मार्गाद्वारे अमोनियम नायट्रेट प्लांट उभारण्याची योजना आहे. महानदी कोलफिल्ड्स लिमिटेडद्वारे ओडिशातील लखनपूर परिसरात उभारण्यात येणारा प्लांट सुरुवातीला दररोज 2,000 टन अमोनियम नायट्रेट तयार करेल. वार्षिक उत्पादन अंदाजे 6.60 लाख टन असेल, ज्यासाठी 1.3 मिलियन टन कोळशाची आवश्यकता असेल. CIL कोळसा पुरवठा करेल.

याबाबत कोळसा मंत्रालयाने म्हटले की, "दोन कॉर्पोरेट दिग्गज एकत्र येणे राष्ट्रीय कोळसा गॅसिफिकेशन मिशनच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. यामुळे कोळशाच्या रासायनिक गुणधर्मांचा वापर करणे सुलभ होईळ." 

अमोनियम नायट्रेट कुठे वापरले जाते?अमोनियम नायट्रेट हा स्फोटकांच्या निर्मितीमध्ये महत्त्वाचा घटक आहे, ज्याचा वापर CIL त्याच्या OC खाण ऑपरेशन्समध्ये मोठ्या प्रमाणात करते आणि कंपनीसाठी कोळसा उत्पादनाचा एक प्रमुख स्त्रोत आहे. आगामी प्लांटमुळे कच्चा माल सुरक्षित करणे, अमोनियम नायट्रेटचे आयात अवलंबित्व कमी करणे आणि आत्मनिर्भर भारत मोहिमेला चालना देण्यासाठी मदत करेल.

स्टॉकवर लक्ष ठेवाBHEL बद्दल सांगायचे तर या महारत्न कंपनीने एका वर्षात 200 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. कंपनीचा शेअर सध्या 223 रुपयांवर व्यवहार करत आहे. तर, कोल इंडियाने गेल्या एका वर्षात 98 टक्क्यांहून अधिक परतावा दिला आहे. हा शेअर सध्या 434 रुपयांवर व्यवहार करत आहे. या दोन महारत्न कंपन्यांमध्ये झालेल्या करारामुळे उद्या(दि.29)चा दिवस महत्वाचा असणार आहे. या दोन्ही कंपन्यांचे शेअर वाढू शकतात.

(टीप- शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घ्या.)

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक