Join us  

BSE Market Capitalisation : महिंद्र, SBI आणि भारती एअरटेलची जोरदार कामगिरी; सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी पातळीवर बंद, 'या' शेअर्सनी खाल्ला भाव

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2024 4:18 PM

BSE Market Capitalisation : भारतीय शेअर बाजाराच्या मार्केट कॅपने पहिल्यांदाच ४७६ लाख कोटी रुपयांचा विक्रमी उच्चांक गाठला आहे.

Stock Market Closing On 23 September 2024 : गेल्या आठवड्यातील तेजी सोमवारीही शेअर बाजारात दिसून आली. आठवड्यातील पहिले व्यवहारिक सत्र भारतीय शेअर बाजारासाठी ऐतिहासिक ठरले आहे. सेन्सेक्स आणि निफ्टी विक्रमी पातळीवर बंद झाले आहेत. BSE सेन्सेक्स केवळ २० अंकांच्या फरकाने ८५००० चा विक्रमी उच्चांकपासून दूर राहिला. तर निफ्टी ४४ अंकांनी २६००० चा ऐतिहासिक उच्चांक गाठण्यात मागे पडला. आज बँकिंग, ऑटो, एफएमसीजी आणि ऊर्जा शेअर्समध्ये जोरदार खरेदी झाल्यामुळे बीएसई सेन्सेक्स ३८४ अंकांच्या उसळीसह ८४,९२८ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४८ अंकांच्या उसळीसह २५,९३९ अंकांवर बंद झाला.

या शेअर्समध्ये चढउतारसेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी २१ शेअर्स वाढीसह आणि ९ शेअर्स घसरणीसह बंद झाले. महिंद्रा अँड महिंद्रा ३.१८%, एसबीआय २.३५%, भारती एअरटेल २.२६%, एचयूएल १.५४%, कोटक महिंद्रा बँक १.४९%, अल्ट्राटेक सिमेंट १.४२%, अदानी पोर्ट्स १.२४%, टाटा स्टील १.२२%, एनटीपीसी  १.०३%, एचडीएफसी बँक ०.९८ टक्के वाढीसह बंद झाला. घसरलेल्या शेअर्समध्ये आयसीआयसीआय बँक १.२५ टक्के, इंडसइंड बँक १.०५ टक्के, एशियन पेंट्स ०.९७ टक्के, टेक महिंद्रा ०.८९ टक्के, एचसीएल टेक ०.४९ टक्के, इन्फोसिस ०.४८ टक्के, टीसीएस ०.४१ टक्के, एलअँडटी ०.२१ टक्के, सन ०.३ टक्के, JSW स्टील ०.०१ टक्क्यांच्या घसरणीसह बंद झाला.

शेअर बाजार विक्रमी पातळीवरशेअर बाजार विक्रमी पातळीवर बंद झाल्यामुळे शेअर बाजाराचे मार्केट कॅप नव्या ऐतिहासिक उच्चांकावर बंद झाले आहे. पहिल्यांदाच बीएसईवर लिस्टिंग शेअर्सचे मार्केट कॅप ४७६ लाख कोटी रुपयांच्या विक्रमी पातळीवर बंद झाले आहे, जे मागील सत्रात ४७१.७१ लाख कोटी रुपयांवर बंद झाले होते. म्हणजेच आजच्या सत्रात मार्केट कॅपमध्ये ४.२९ लाख कोटी रुपयांची झेप घेतली आहे.

सेक्टरॉल अपडेट आजच्या व्यवहारात बँकिंग, ऑटो, एफएमसीजी, मेटल्स, एनर्जी, रिअल इस्टेट, इन्फ्रा, कंझ्युमर ड्युरेबल्स, ऑइल अँड गॅस आणि हेल्थकेअर शेअर्स वाढीसह बंद झाले. तर आयटी शेअर घसरत बंद झाले. आजच्या व्यवहारात निफ्टीचा मिडकॅप निर्देशांक ५०३ अंकांच्या उसळीसह ६०,७१२ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.

(Disclaimer- यामध्ये शेअरच्या कामगिरीविषयी माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

टॅग्स :शेअर बाजारगुंतवणूकपैसाशेअर बाजार