Lokmat Money >शेअर बाजार > धनत्रयोदशीपूर्वीच गुंतवणूकदारांवर धनवर्षा, या IPO नं पहिल्याच दिवशी दुप्पट केला पैसा! झाला 100% फायदा

धनत्रयोदशीपूर्वीच गुंतवणूकदारांवर धनवर्षा, या IPO नं पहिल्याच दिवशी दुप्पट केला पैसा! झाला 100% फायदा

संपूर्ण इश्यूमध्ये 18.16 लाख शेअर्स होते...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2023 06:45 PM2023-11-07T18:45:40+5:302023-11-07T18:48:39+5:30

संपूर्ण इश्यूमध्ये 18.16 लाख शेअर्स होते...

maitreya medicare limited IPO doubled the money on the first day give 100 percent return | धनत्रयोदशीपूर्वीच गुंतवणूकदारांवर धनवर्षा, या IPO नं पहिल्याच दिवशी दुप्पट केला पैसा! झाला 100% फायदा

धनत्रयोदशीपूर्वीच गुंतवणूकदारांवर धनवर्षा, या IPO नं पहिल्याच दिवशी दुप्पट केला पैसा! झाला 100% फायदा

शेअर बाजारात मैत्रेय मेडिकेअर आयपीओची (Maitreya Medicare Limited IPO) जबरदस्त लिस्टिंग झाली आहे. ही कंपनी एनएसई एसएमई (NSE SME)मध्ये 98.23 टक्क्यांच्या प्रीमियमसह 162.55 रुपयांवर लिस्ट झाली. यानंतर, थोड्याच वेळात कंपनीचा शेअर 164 रुपयांवर पोहोचला. अर्थात गुंतवणूकदारांचा पैसा पहिल्याच दिवशी दुप्पट झाला. कंपनीच्या आयपीओची किंमत बँड 78 रुपये ते 82 रुपये प्रति शेअर होती. 

या धमाकेदार लिस्टिंगनंतर, कंपनीच्या शेअर्समध्ये विक्री दिसून आली. यामुळे मैत्रेयच्या शेअरला लोअर सर्किट लागले आणि स्टॉक 154.55 रुपयांवर खाली गेला. यानंतर, मैत्रेय मेडीकेअर लिमिटेडच्या आयपीओची साइज 14.89 कोटी रुपयांवर आली आहे. संपूर्ण इश्यूमध्ये 18.16 लाख शेअर्स होते.

एका लॉटमध्ये 1600 शेअर - 
मैत्रेय मेडीकेअर लिमिटेडच्या आयपीओची लॉट साइज 1600 शेअर्सची ठेवण्यात आली होती. यामुळे प्रत्येक गुंतवणूकदारांना किमान 1,31,200 रुपयांची गुंतवणूक करावी लागली. कंपनीने अँकर गुंतवणूकदारांच्या माध्यमाने 4.05 कोटी रुपये जमवले होते. अँकर गुंतवणूकदारांसाठी 14 मार्च 2024 हा लॉक इन पीरियड असणार आहे.

(टीप - हा गुंतवणुकीचा सल्ला नाही. शेअर मार्केटमधील गुंतवणूक ही जोखमीवर अवलंबून असते. त्यामुळे, गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला आणि मार्गदर्शन घेणे अत्यंत आवश्यक आहे.)
 

Web Title: maitreya medicare limited IPO doubled the money on the first day give 100 percent return

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.