Join us  

हा IPO बनला पैसे छापण्याची मशीन; 6 वर्षात गुंतवणूकदार झाले मालामाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2023 8:02 PM

या आयपीओद्वारे अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही कोट्यवधी रुपयांची कमाई केली आहे.

Mamaarth IPO: कॉस्मेटिक ब्रँड Mamaarth चा IPO काही प्रमोटर्ससाठी पैसे छापण्याचे मशीन बनला आहे. अलीकडेच शिल्पा शेट्टीबाबत बातमी आली होती की, कंपनीची प्रमोटर शिल्पाला IPO च्या माध्यमातून करोडो रुपयांचा नफा झाला आहे. आता आलेल्या बातमीने संपूर्ण बाजार हादरला आहे. Mamaearth चालवणारी कंपनी, Honasa Consumer च्या दोन सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना 100 पट फायदा होऊ शकतो. दोन्ही गुंतवणूकदारांनी 6 वर्षांपूर्वी शेअर्स विकत घेतले होते. तेव्हापासून आतापर्यंत कंपनीच्या शेअर्समध्ये 100 पट वाढ झाली आहे. 

शेअर्स 3.21 रुपयांनी विकत घेतलेस्नॅपडीलचे सह-संस्थापक कुणाल बहल आणि रोहित कुमार बन्सल, या दोन दिग्गज गुंतवणूकदारांनी ऑगस्ट 2017 मध्ये मामाअर्थ कंपनीमध्ये केवळ 3.21 रुपये प्रति शेअर या सरासरी किमतीत हिस्सा विकत घेतला होता. सध्या कंपनीच्या शेअरची किंमत 324 रुपये आहे. म्हणजेच, या दोन गुंतवणूकदारांना सुमारे 10000 टक्के परताव्यासह 38.27 कोटी रुपयांचा नफा मिळू शकतो. बहल आणि बन्सल त्यांच्या एकूण 23,86,500 शेअर्सपैकी 11,93,250 शेअर्स IPO पूर्वी विकत आहेत. दोघांनी 11.9 लाख शेअर्स सुमारे 38.30 लाख रुपयांना विकत घेतले होते आणि आता ते IPO मध्ये 38.66 कोटी रुपयांना विकत आहेत, ज्यामध्ये OFS देखील समाविष्ट आहे.

Mamaarth IPO मधून कोणाला किती फायदा होईल?ज्यांनी OFS मध्ये भागभांडवल विकले त्यात प्रमोटर्स पती-पत्नी वरुण अलघ आणि गझल अलघ, ऋषभ हर्ष मारीवाला, बॉलीवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा, फायरसाइड व्हेंचर्स, सोफिना आणि स्टेलारिस यांचा समावेश आहे. शिल्पा शेट्टी 13.9 लाख शेअर्स विकत आहे, जे तिने 2018 मध्ये फक्त 41.86 रुपये प्रति शेअर या सरासरी किमतीत विकत घेतले होते. शिल्पाला तब्बल 674 टक्के नफा मिळत आहे. मॅरिकोचे संस्थापक हर्ष मारीवाला यांचा मुलगा ऋषभ हर्ष मारीवालादेखील 6.05 रुपये प्रति शेअर दराने खरेदी केलेले सुमारे 57 लाख शेअर्स विकत आहे. त्यालाही 5255 टक्के रिटर्न्स मिळत आहेत.  

IPO नंतर Mcap 10,425 कोटी होईलMamaearth IPO नंतर कंपनीचे मार्केट कॅप रु. 10,425 कोटी होऊ शकते. एकूण IPO आकाराच्या रु. 1,701.44 कोटींपैकी, OFS रु. 1,336.44 कोटी आहे आणि नवीन इश्यू रु. 365 कोटी आहे. IPO नंतर, प्रवर्तकांची हिस्सेदारी 35.3 टक्के कमी होईल. IPO 2 नोव्हेंबर रोजी सबस्क्रिप्शनसाठी बंद होईल आणि 10 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजेसवर सूचीबद्ध होऊ शकेल.

टॅग्स :शेअर बाजारशेअर बाजारव्यवसायगुंतवणूक